फेब्रुवारी 2017. सायबेरिया, रशियातील इर्कुट्स नावाच्या 14 मजली इमारतीभोवती पोलिसांचा गराडा पडला होता. गोष्ट तशी सिरीयसच होती कारण जमिनीवर 15 वर्षाची युलिया अन 16 वर्षाची व्हेरोनिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दोघींनीही इमारतीच्या छतावरून उड्या मारल्या होत्या. वरकरणी मामला आत्महत्येचा वाटत होता परंतु मृत्यू पावलेल्या दोघींनीही मरणापूर्वी सोशल मिडीयावर जे मेसेज पाठवले होते ते भयंकर होते. युलीयाने फेसबुकवर एका निळ्या व्हेल माश्याचे चित्र अन त्यावर END असा तर व्हेरोनिकाने “Sense is lost… End” अश्या पोस्ट पब्लिश केल्या होत्या. रशियन पोलीसांना या दोन्ही घटना म्हणजे पुढे होऊ घातलेल्या अघोरी घटनांची चाहूल वाटत होती. कारण सोशल मिडीयावर एका भयानक गेम येऊ घातला होता. जो गेम खेळणाऱ्याचा जीवच घेणार होता..अन झाले तसेच. थोड्याच दिवसात स्नोआर्क (Krasnoyarsk) गावातील 15 वर्षाच्या कतरिनाने उंच अपार्टमेंटवरून उडी मारली….

ती जो गेम खेळत होती तो होता…Blue Whale Challenge…ब्लू व्हेल गेम.

आज जगभरात खौफ निर्माण करणाऱ्या “ब्लू व्हेल” या किलर गेमबद्दल स्मार्ट तुम्हाला सावध करणार आहे.

1. मृत्यूचा खेळ – तडफडणारे व्हेल्स

“ब्लू व्हेल चॅलेंज” हा एक इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन खेळायचा गेम आहे. गेममध्ये पार्टीसीपेट झाल्यावर प्लेअरला 50 दिवसात 50 टास्क पूर्ण करायचे असतात. परंतु इतर गेम्स प्रमाणे टास्क्स कॉम्प्युटर ठरवत नाही तर गेमचा परदेशात बसलेला अॅड्मीनीस्ट्रेटर (जो प्लेयरच्या ऑनलाईन संपर्कात असतो) ठरवत असतो. अन हीच तर भयानक गोष्ट आहे कारण पन्नासावा टास्क म्हणून अॅड्मीन प्लेअरला आत्महत्या करायला सांगतो. या गेमच्या संमोहनाखाली आलेली जगभरातील अनेक मुले हेच तर करत आहेत.

गेमला (blue whale Internet suicide game challenge) ब्लू व्हेल नाव पडण्यामागचे कारण म्हणजे समुद्रातील खरोखरच्या ब्लू व्हेल्सचे चमत्कारिक वागणे. कधीकधी हे व्हेल्स शेकडोंच्या संख्येने किनाऱ्यावर झेप घेतात केवळ जीवन संपवण्यासाठी. वाळूत तडफडत मरणाऱ्या या व्हेल्समूळेच अॅड्मीनने हे नाव या जीवघेण्या गेमला दिले.

2. कोठे मिळतो हा गेम?

ब्लू व्हेल गेम हा इतर गेम्स प्रमाणे डाऊनलोड करता व विकत घेता येत नाही. हे काही कॉम्प्युटर अप्लिकेशन नाही वा सॉफ्टवेअर पण नाही. मग काय आहे हा गेम?

ब्लू व्हेल गेम हा एक सोशल मिडीयावर दिले जाणारे चालेंज आहे. उदाहरणार्थ मध्यंतरी “आईस बकेट” नावाचे एक चालेंज आले होते ज्यामध्ये चालेंज अॅक्सेप्ट करणाऱ्याने थंड पाण्याची बादली डोक्यावर ओतून घ्यायची होती. त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडीयावर पब्लिश करायचा अन त्यातच दुसऱ्या व्यक्तीला चालेंज, आव्हान द्यायचे. जर त्याने ते स्वीकारले तर त्यानेपण डोक्यावर ओतून घ्यायचे अन दुसऱ्याचे नाव घ्यायचे. ही चेन तशीच पुढे सुरु ठेवायची. आईस बकेट हे एक मजेशीर चालेंज होते ज्यामध्ये फक्त अंग थंड व्हायचे. पण ब्लू व्हेलच्या निर्मात्याने थंड डोक्याने जे चालेंज सुरु केलाय ते प्लेअरचा जीव गेल्यावरच संपते.

तर हा गेम फक्त सोशल मिडीयावर चालेंजच्या स्वरूपातच मिळतो. कोणता ग्रुप हे चालेंज देतो हे सिक्रेटच राहते. ग्रुप अॅड्मीन सोशल मिडीयाद्वारे प्लेअरवर वॉच ठेवतो, एक स्टेप पूर्ण केल्यावर प्रुफ बघून पुढचे टास्क देत राहतो. पन्नासावे टास्क अन प्लेअर संपल्यावरच गेम संपतो.

3. कोणी सुरु केला हा मृत्यूचा खेळ?

आज जगाच्या कानाकोपऱ्यात झपाट्याने पसरणारा हा मृत्यूंच्या खेळाची सुरुवात रशियात झाली. 2013 साली “F 57” नावाने. रशियन सोशल मिडीयावर “देथ ग्रुप” या सिक्रेट ग्रुपने हा जीवघेणा खेळ सुरु केला. फिलीप बुदेकीन (Philipp Budeikin) या रशियन विद्यार्थ्याने याची निर्मिती केली. फिलीप मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला मानवी मनाला आगतिक कसे बनवता येईल याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे मनाने विक असलेल्या मुला मुलीना टार्गेट करून त्याना संपवायचे याच विचाराने हे सुरु झालेल्या खेळाने आपला पहिला बळी 2015 साली घेतला. नंतर त्याची युनिव्हर्सिटी मधून हकालपट्टी केली गेली. गेम सुरु करायचे कारण विचारल्यावर त्याने “ही एक जग शुद्ध करायची प्रोसेस आहे अन अनफिट, ज्यांची काही किंमत नाही त्या लोकाना जगातून दूर करायलाच पाहिजे..” असे उद्गार काढले. “ब्लू व्हेल” असे गोंडस नाव धारण करून हाच गेम रशियात परत सुरु झाला. अन एकाच वर्षात म्हणजे 2016 पर्यंत 16 लोकांचा त्याने बळी घेतला.

4. काय करायचे आहे ह्या गेममध्ये?

वर सांगितल्या प्रमाणे यात प्लेअरला 50 टास्क पूर्ण करायचे आहेत. हे टास्क पुढील प्रमाणे :

हातावर चाकूने वा ब्लेडने लिहिणे, सकाळी 4.20 ला उठून अड्मीनने पाठवलेला हॉरर मुव्ही बघणे, स्वतःच्या हातावर उभी जखम करणे, कागदावर व्हेलचे चित्र काढणे अन अॅड्मीनला पाठ्वणे, आता गेमला होकार म्हणून पायावर “YES” असा ब्लेडने कट मारून घेणे.

आता इथून गेमचा पुढचा पार्ट सुरु ज्यामध्ये अॅड्मीन काही सिक्रेट पण कमी भयंकर टास्क प्लेअरला देतो. हेतू हाच की मनाची तयारी करणे. यात प्लेअरला एकदा इमारतीच्या छतावर, पुलाच्या कठड्यावर उभे रहायला सांगितले जाते. मधेच अॅड्मीन एक गूढ म्युझिक टेप पाठवून ती सतत ऐकाला लावतो. हे अकरा ते वीस टास्क्समध्ये. आता अॅड्मीन स्वतः प्लेअरबरोबर स्काईपवर बोलतो असे म्हणतात. मग सुरु होते मृत्यूकडे वाटचाल. नेमके कोणते टास्क दिले जातात हे कोणालाच कळत नाही. परंतु तिसाव्या टास्कला प्लेअरला मरणाची शपथ घ्यायला लावली जाते असे समजते. एकतीस ते एकोणपन्नासमध्ये प्लेअर पूर्णपणे अॅड्मीनच्या कह्यात अन शेवट..

आत्महत्या.

5. आहात का तुम्ही सेफ?

कदाचित नाही. कारण ब्लू व्हेलचे जगभर फिरणारे यमदूत भारतातही पोहचले आहेत.

अनेक देशातील सरकारने गुगल, फेसबुक अन इतर कंपन्याना, सोशल मिडियांना “ब्लू व्हेल” च्या लिंक्स नेटवरून काढून टाकायला सांगितल्या आहेत. 26 मे 2017 रशियन पार्लमेंट (DUMA) सोशल मिडीयावर आत्महत्येला प्रवृत्त करणारे ग्रुप्स सुरु करणे, तश्या स्वरूपाची कामे करण्याऱ्या विरुध्द कडक शिक्षेची तरतूद केली. 7 जूनला प्रेसिडेंट पुतीन यांनी त्यावर सही केली अन लगेचच दुसऱ्या दिवशी आल्या सिदोरोव्ह (Ilya Sidorov) नावाच्या अॅड्मीनला मास्कोमध्ये अटक केले गेले. निर्माता फिलीप पिटसबर्ग जेलमध्येच आहे.

तरीसुद्धा 26 जुलै 2017 ला केरळमधील ज्या 16 वर्षाच्या मुलाने त्याचे जीवन संपवले त्या मुलाच्या आईने जे सांगितले ते “ब्लू व्हेलशी” अगदी मिळते जुळते आहे. या मुलाने हातावर कंपासने जखमा करून घेतल्या होत्या, या लहान मुलाने स्वतःच्या मृत्यू बद्दल बोलायला सुरुवात केली होती इतकेच नव्हे तर तो रात्री अपरात्री स्मशानभूमीत जाऊ लागला होता. नंतर 30 जुलै 2017 ला मुंबई, 10 ऑगस्टला इंदोर.. घटना तर घडतच आहेत…

दोस्तहो, स्मार्टचा हा लेख लिहायचा हेतू या गेमची माहिती देणे नसून अश्या गेम पासून दूर कसे राहता येईल हे सांगण्याचा आहे. तेव्हा सोशल मिडीयावर जर कोणाला असे चालेंजेस दिले जात असतील तर जरूर जपायला सांगा. जमले तर पोस्ट शेअर करा.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

3,793 total views, 1 views today