सुट्टीत कोणत्यातरी हटक्या ठिकाणी जाण्याचा विचार हल्ली अनेकजण करत असतात. काहीतरी जगावेगळे करायचे म्हणून आदिवासी बघायला ब्राझीलच्या जंगलात फिरतात तर काही पूर्व रशियाला धडकतात अन आ वासून तयारीत असलेल्या जिवंत ज्वालामुखीच्या विवरात काय आहे ते शोधतात. दोस्तहो तुम्हाला पण असेच काहीतरी अडव्हेंचरस करायचे असेल तर बर्फाच्या पर्वत रांगातील रहस्यमय हिममानावाला “यती” ला शोधायला जायला काही हरकत नाही. म्हणूनच हजारो वर्षापासून हिमालयात ज्याचे अस्तित्व आहे असे सांगितले जाते त्या हॉरीबली मोठ्या मनुष्यासारख्या दिसणाऱ्या विचित्र हिममानवाबद्दल म्हणजेच “यती” बद्दलच्या 5 रहस्यमय बाबी येथे देत आहे. वाचा तर काय आहे हे यती प्रकरण..

1. “अबामनबल” हिममानवाच्या नावाची कहाणी :

हा सारे सुरु झाले ते 1921 ला… लेफ्टनंट कर्नल चार्ल्स हॉवर्ड बरीच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश गिर्यारोहाकांची एक टीम माउंट एव्हरेस्ट चढत असताना 21000 फुट उंचीवर “लाक्पा ला” पॉईंटला बर्फात भल्या मोठ्या पाउलखुणा उमटलेल्या दिसल्या. साधारण माणसाच्यापेक्षा आकाराने तिप्पट मोठ्या वजनदार प्राण्यांच्या पायांमुळे दबलेला बर्फ चार्ल्सच्या मनात एक वेगळीच शंका उत्पन्न करून गेला. तो प्राणी हिमअस्वल असणे शक्य नव्हते कारण बर्फात फक्त दोनच पावलांच्या खुणा लांबवर गेलेल्या दिसत होत्या. बरोबरच्या वाटाड्या शेर्पानी चार्ल्सला या खुणा “मेतोह कांग्मी” (‘metoh-kangmi’) नावाच्या हिममानवाच्या आहेत अन ते मानव हजारो वर्षापासून हिमालयात राहत आले आहेत हे सांगितले.

गंमत म्हणजे “मेतोह कांग्मी” नावाचा कोणताच शब्द नेपाळी, तिबेटी भाषेत अस्तित्वात नव्हता. तरी सुद्धा सन 1956 पर्यंत या गूढ मानव सदृश्य प्राण्याला हेच विचित्र नाव जोडले गेले होते. वेगवेगळ्या पुस्तकातून हेच नाव जगापुढे आले होते. पण 56 ला कलकत्त्यातून प्रसिध्द होणाऱ्या दी स्टेट्समन नावाच्या इंग्लिश पत्रिकेच्या हेन्री न्यूमन या वार्ताहराने शेर्पांची मुलाखत प्रसिध्द केली पण “मेतोह कांग्मी” हा शब्द न समजल्याने ताने चक्क “Abominable Snowman” म्हणजे अमंगळ हिममानव हा शब्द वापरला जो आज देखील प्रचलित आहे.

2. यतीचा चक्क फोटो :

हिमालयात कोई तो है हे विसाव्या शतकात एव्हरेस्टवर स्वारी करणाऱ्या जगभरच्या रोहकांमुळे सर्वाना माहित हॉट होते. पण नेमके ते काय आहे अन कसे दिसते हे कोणीच ठामपणे सांगू शकत नव्हते. ही कमी 1925 ला तोबाझी नावाच्या ग्रीक छायाचित्रकारामुळे पुरी झाली. बर्फात 15000 फुटावर चढाई करत असताना सुमारे 200 यार्डवर तोबाझीला झाडामागे एक माणसापेक्षा मोती आकृती दोन पायावर उभी असलेली दिसली. अंगावर काहीच कपडे नसलेली ही व्यक्ती अतिथंड बर्फाळ वातावरणात आरामात झाडावरील पाने तोडून खात असताना त्यांनी पाहिली. जवळपास एक मिनिट शांतपणे खाणे करून तो प्राणी निघून गेला. परत येताना तोबझीला त्या प्राण्याच्या पाउलखुणा आढळून आल्या. साधारण माणसाच्या पायापेक्षा सहा इंच लांब अन चार इंच रुंद अशा या खुणा आकाराने प्रचंड मोठ्या यतीची जाणीव जगाला करून गेल्या.

3. नाझी, अलेक्झांडर दी ग्रेट, अन दी ग्रेट यती :

हिमालयातील या यतीबद्दल ग्रीक सम्राट अलेक्झांडरला पण आकर्षण होते. जगावर राज्य करण्याचे स्वप्न घेवून इंडस खोऱ्यापर्यंत आलेल्या या राजाला “यती”बद्दल माहिती मिळाल्यावर त्याने लगेचच यातीला शोधायची आज्ञा सरदारांना दिली. ही गोष्ट आहे ख्रिस्तपूर्व 326 सालची. म्हणजे हिमालयीन यतीची महती त्याकाळीसुद्धा होती. सैनिकांनी हिमालयात शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण दी ग्रेट अलेक्झांडरला दी ग्रेट यती सापडला नाही.

दोस्तहो.. हिटलरच्या काळातसुद्धा नाझींनी चित्रातील हिमलरच्या नेतृत्वाखाली यती शोधायला जर्मनीमधून अधिकारी पाठवले होते. आर्य वंशाबद्दळ अभिमान असल्यामुळे व हिमालयातील यती आर्य वंशाचा असण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच हिटलरचा हा खटाटोप होता.

यती खरच ग्रेट… होय ना?…

4. यतीच्या हाताची चोरी :

पन्नाशीच्या दशकात यतीला शोधायच्या अनेक सरकारी अन खाजगी मोहिमा हिमालयावर चालून गेल्या. परंतु त्यातील टॉम स्लिक या धनाड्य अन धाडशी अमेरिकन माणसाची मोहीम एखाद्या हॉलीवूड पिक्चरमध्येच शोभेल अशी होती. नेपाळ मधील पान्गोचे नावाच्या ठिकाणी, बुद्ध मठामध्ये यतीचा अस्थीरुपी हात व कवटीचा तुकडा जतन केला आहे हे समजल्यावर त्याने नेपाळमध्ये धडक मारली. मठाला अनेक आमिषे दाखवून तो हात मिळवायची खटपट त्याने सुरु केली पण त्याला साधूंनी नकार दिला. पीटर बार्ने या साथीदाराला हाताशी धरून त्याने चक्क हात चोरायचाच प्लॅन केला. स्मशानातून हाडे गोळा करून ती मठातील यतीच्या हाताच्या जागी ठेवायचा पराक्रम त्याने केला. इतकेच नव्हे तर जिमी स्टेवार्ड नावाच्या हॉलीवूड स्टारद्वारे त्याने तो हात लंडनमध्ये गायब केला. इतिहासात “Pangboche Hand” ची खरी चोरी इंडियाना जोन्स चित्रपटाप्रमाणे गाजली.

5. यतीच्या शिकारीचे लायसन्स  :

यतीला शोधायच्या वेडाचे लोण जगभर पसरले अन हौशी लोकांचे लोंढे तिबेट, नेपाळ भागात फिरू लागले. पर्यटकांची ही गर्दी पाहून धंदेवाईकांनी पैसे मिळवण्याच्या अनेक आयडीया काढल्या. परंतु सर्वात सुपीक आयडीया नेपाळ सरकारनेच काढली. चारशे पाउंड (ब्रिटीश चलन) दिल्यावर तुम्हाला यतीची शिकार करायचे लायसेन्स मिळेल असे त्यांनी जाहीर केले. हजारोंनी पाउंड खर्च करून लायसेन्स मिळवले पण यती कोणालाच मिळाला नाही.

येथे यती कहाणी संपूर्णम..

1,133 total views, 1 views today