बदाम म्हटलं की स्मार्टला आठवतात ते अडॅम अन इव्ह. प्रेमाचा प्रतिक बदाम. असो आता आपण त्या प्रेमाबद्दल बोलायचे नाही तर बदामा बद्दल बोलायचे आहे. म्हणजे बदाम नावाच्या कुरकुरीत ब्राउनी नट्स बद्दल. काही स्त्रीवर्ग त्याला खिरीत घालून नवरोबाला अर्पण करतात तर काही बाबा लोक सर्वांगाला चॉकलेट लावलेले बदाम बेबी लोकांना. कदाचित प्रेमाची सुरुवात पोटातून होते यावर त्यांचा ठाम विश्वास असेल. असो आज बदामाच्या हेल्दी फायद्याबद्दल बोलायचे आहे.

बदाम हेल्थ साठी फार उपयोगाचा आहे हे हजारो वर्षापासून जगाला माहित आहे. पण जाता येता वाळके बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खाणे कधीही फायद्याचे असे नेट वर वाचले. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला बघून यामागचे नेमके कारण काय हे जाणून घेतले अन लिहिली ही भिजवलेल्या बदामांच्या आरोग्यदायी फायदयाची यादी.

बदाम हे आरोग्यदायी आहेत. बदाम व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अॅबसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्याा काही एन्झाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.

1. पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते. बदाम भिजवून ठेवल्याने ते नरम पडतात जे पचण्यास योग्य असतात. भिजलेले बदाम पचन क्रियेला मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

2. रक्तदाब नियंत्रण

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70 वयोगटातील पुरूंषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला. रोज नेमाने बदाम खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत. भिजलेले बदाम खाल्ल्याने रक्तात अल्फाल टोकोफेरॉलची मात्रा वाढते, जी एक सामान्य ब्लड प्रेशरला व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते.

मधुमेही व्यक्तींना बदाम खाल्ल्याने त्यांचे शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहते. बदामाची साल कोरडी असते. त्यामुळे ती काढून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु त्याच्यात रक्त वाढवण्याची ताकद असते. तेव्हा बदामाचे बी त्याच्या सालीसहीत खाल्ले पाहिजे. बदामाचा दुसरा फायदा म्हणजे त्यामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त शुध्दीकरण होते.

3. हृद्याचे कार्य सुधारते

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अॅकन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील LDL कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. (almonds are very potent antioxidant agents that prevent the oxidation of LDL cholesterol) यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा. हे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात.


4. शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदाम शरीरातील चांगले कोलेस्टरॉलची मात्रा वाढवण्यात आणि ‘खराब’ कोलेस्टरॉलच्या स्तराला कमी करण्याचे कार्य करतात. बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते.

5. वजन घटवण्यास मदत होते

तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्या सेवनाने चरबी वाढत नाही. सुका मेव्यामधील बदामात सर्वात लो फॅट असतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्याद भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

बदामामध्ये भूक भागवण्याची मोठी ताकद असते. काही वेळा डाएटिंग करणार्याt लोकांना याबाबत सल्ला दिला जातो. त्यांना अनेक गोष्टी खाणे वर्ज्य असते परंतु कधी कधी खूपच भूक लागते आणि खाण्यास योग्य असे पदार्थ हाताशी नसतात. अशा वेळी मोजून चांगले बारा बदाम खावेत. या बारा बदामांचे सेवन एका ब्रेकफास्टचे काम करते. पोट तर भरते. पोषक द्रव्ये तरी मिळतात परंतु कॅलरिज मात्र वाढत नाहीत. Adding almonds into one’s low calorie diet was extremely beneficial in weight loss.

जाता जाता हे बदाम बाबा जगात आले कोठून हे सांगतो. साधारणपणे 190000 वर्षापूर्वी इराण मध्ये बदामाची झाडे होती हे समजले आहे. इराण नंतर अफगाणिस्तान, तुर्कस्तान असे करत करत आता हे बाबा सगळ्या जगात पसरले आहेत. बायबलमध्ये याचा उल्लेख आहे तर पूर्वीची लोक नुसते बदाम खात नव्हते तर त्याची पाने दागिन्याच्या डब्यात ठेवत होती. कदाचित या पानांचा आयुर्वेदिक उपयोग होत असेल. असो आपण फक्त भिजवलेले बदाम खायचे आहेत, पाने नव्हे.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

1,525 total views, 6 views today