स्मार्टदोस्तच्या प्रवास यादीत दोस्तांनी कोठे जावे याबद्दल माहीती दिली जातीच, परंतु या यादीत आज तुम्ही कोठे जावू नका, म्हणजे जरी गेला तरी तूम्हाला तेथे येण्यास बंदी असणाऱ्या ५ ठिकाणांची यादी देत आहोत. तर मग फक्त माहिती घ्या. जावू मात्र नका.

1. १७,३०० वर्षांपूर्वीची चित्रे असणारी लॅसकाक्स गूंफा फ्रान्स :

अश्मयूगीन काळातील रंगवलेली सुमारे ९०० चित्रे असणारी लॅसकाक्स गुंफा दक्षिणफ्रान्स मध्ये आहे. युनेस्कोने जागतीक वारसा म्हणून घोषीत केलेले हे ठिकाण. सन १९४० ला अगदी अपघाताने सापडलेली ही गुंफा सन १९६३ पासून सार्वजनीक प्रदर्शनास बंद आहे. दररोज भेट देणाऱ्या हजारो लोकांच्या श्वासाव्दारे बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमूळे चित्रांवर परीणाम होवू लागल्यामूळेच ही बंदी आणली गेली. फक्त एकच संशोधक फक्त २० मिनीटांसाठी आत सोडला जायचा. त्याने आठवड्यातून काही दिवस चित्रांच्या स्थितीची पाहणी करायची असा नियम केला गेला. याचा अर्थ तुम्हा आम्हाला या गुंफा बघायला बंदी.

2. भूतांच्या भितीने अक्षरश: निर्मनूष्य झालेले पोवेग्लीया ( Poveglia) बेट-इटली

इटलीच्या उत्तरेस असणारे हे छोटेसे बेट. सुरूवातीच्या काळात निर्वासितांची छावणी असणारे हे बेट अनेक स्थित्यंतराचा साक्षीदार आहे. सन १३४८ मध्ये व्हेनिसमधील रोगी लोकांना या बेटावर पाठवले जायचे. बेटाच्या मध्यभागी मेलेल्या आणि मरू घातलेल्या लोकांना पूरले जायचे. सतत फक्त रोगी लोकांनी भरलेले हे बेट पुन्हा १९२२ ते १९६८ पर्यंत याच कामासाठी वापरले गेले. कायम मृत्यूचे घर बनलेल्या या बेटावर नंतर कोणीही धडधाकट माणूस जायला घाबरू लागला. रोगांमुळे पसरलेली भयानक प्लेगची साथ आणि सोबत भूतांची वस्ती असल्याचा भास यामुळे हा बेट स्थानिक लोकांसाठी व प्रवाश्यांसाठी नंतर बंद करण्यात आले. सध्या हे बेट विक्रीस काढले आहे. परंतु विकत घेण्यास कोणीही तयार नाही.
संदर्भ:द गार्डीयन.

3. परदेशी लोकांना बंदी असलेले हेरगिरींचे वस्तूसंग्रहालय – चिन :

स्वत:च्या इतिहासाबद्दल प्रचंड अभिमान असणाऱ्या चीन बद्दल अनेक कथा असतात. जिऍन्सू नॅशनल सेक्यूरीटी म्यूझीयमहे परदेशी व्यक्तींना बंदी असलेले संग्रहालयहे तशीच कथा. चीनच्या ऐतिहासिक कागदपत्र, छोट्या पिस्तूल, त्यांनी केलेल्या गुप्तकारवायांची समग्र माहीती प्रदर्शनास असणारे ह्या संग्रहालयात परदेशी व्यक्तींना संपूर्णपणे बंदी आहे.

4. स्थानिक संस्कृती जपण्यासाठी प्रवाश्यांना बंदी असलेले ‘निशयू’ (Niihau)बेट – हवाई:

परदेशी लोकांपासून अनेक गोष्टी लपवणारा चीनबद्दल वाचलेच. तसेच पण नैसर्गिक ठेवा जतन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे हे पुढील उदाहरण.
हवाईचे निहायू हे बेट प्रवाश्यांना बंद बेटावर ना रोड वा हॉटेल. फक्त पूरातन काळापासून रहवाशी असलेले आदिवासीच या बेटावर राहतात. बेटाची मालकी रॉबीन्सन कु टूंबाकडे आहे. आणि त्यांनीच नैसर्गिक ठेवा जतन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
म्हणून या सुंदर बेटावर फक्त निसर्गाचेच राज्य आहे. टूरीझमच्या नावावर प्रवाश्यांचे नको ते लाड करणारे निसर्गाचे भक्षक कोठे आणि पैसे मिळण्याची सुवर्णसंधी असून सुध्दा बंदी असलेले निहायू कोठे.

5. सॅटेलाइट कंट्रोल एरिया – ऑस्ट्रेलिया :

पाइन गॅप या नावाने ओळखला जाणारा परंतु अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या पृथ्वीभोवती फिरणार्या हेरागिरी करणाऱ्या अंतराळयानांना कंट्रोल करणारी व्यवस्था असणारा प्रदेश. अमेरिकेची अनेक हेरगिरी करणारी याने चीन, रशिया आणि तेलांनी समृध्द अशा मध्यपूर्वेवर सतत लक्ष ठेवून असतात. अशाच यानांना कंट्रोल करण्यासाठी आणि त्याच्या निरीक्षणांच्या नोंदी ठेवण्यासाठी पाइन गॅप भागाचा उपयोग केला जातो. सुमारे १८ वर्ग किलोमीटरच्या या भागात असंख्यसंगणक व रडार्सनी भरलेल्या १४ इमारती आहेत. संपूर्णसुरक्षित अशा या अतिसंवेदनशील भागात तुम्हा-आम्हांस बंदी.

901 total views, 1 views today