जेव्हा ऑगस्ट 1945 ला जगातला पहिला अणूबॉम्ब टाकला गेला तेव्हा जवळपास 129000 लोकांचा अंत तर झालाच पण अणूबॉम्बचा पण अंत झाला. म्हणजे तो पहिला अन शेवटचा अणूबॉम्ब ठरला. परंतु त्या भयंकर विध्वंसाची जी माहिती आपण वाचतो तशीच काहीशी नोंद अनेक भारतीय ग्रंथात हुबेहूब दिली आहे. जणू ज्यांनी ते ग्रंथ हजारो वर्षापूर्वी लिहिले त्यांनी कोठेतरी तसा विध्वंस आखोदेखा पाहिला आहे. असे असेल का की हिरीशिमा नागासाकी वरील अणुहल्ला हा शेवटचा असेल पण पहिला नक्कीच नसेल.  जगातील पहिले अणूयूद्ध प्राचीन भारतात झाले असेल का यावर स्मार्टदोस्तने वाचन केले अन तयार झाली ही यादी. वाचा अन बनवा आपले मत.

1. महाभारतातले अणूयुद्धाचे अचूक वर्णन :

महाभारतात एके ठिकाणी युद्धाचे वर्णन करताना लिहले आहे “…तो एक बाण, जगातल्या सर्व शक्तीने भरपूर..आकाशातून धुराचा व आगीचा लोळ.. जणू हजार सूर्यांएवढा प्रकाशमान…जेव्हा तो जमिनीवर पडला तेव्हा जबरदस्त स्फोट होवून धुराचा एक ढग सरळ जमिनीला काटकोन करून आकाशाकडे झेपावला. काहीच क्षणात त्यातूनच छत्रीसारखे ढग आकाशात पसरले…” पुढे काय लिहलेय ते वाचून तर तुम्हाला हिरोशिमा/नागासाकी अन महाभारतातले वर्णन यात काही फरक दिसतो का ते सांगा. काय हानी झाली त्याचे वर्णन वाचा “त्या संहारानंतर हजारो सैनिक क्षणात मृत पावले. त्यांची शरीरे ओळखता न येण्या सारखी जळाली, जे जिवंत राहिले  त्यांच्या हातापायाची नखे, केस गळून गेली, पक्ष्यांची तीच अवस्था झाली, काही तासातच जवळपासचे अन्न पाणी न खाता येईल असे दुषित झाले…”
जपानमध्ये जे हजारो वर्षांनी झाले त्याचे इतके अचूक वर्णन मनघडन असेल का?

2. हडप्पा मोहेन्दोजारोचा नाश रेडीओ अॅक्टिव किरणांमुळे? :

हडप्पा मोहेन्दोजारोमध्ये जेव्हा उत्खनन सुरु होते त्यावेळची ही नोंद. खोदकाम जेव्हा शेवटच्या टप्प्यात आले तेव्हा हडप्पा मोहेन्दोजारोमधील रस्ते दिसून आले. रस्त्यावर एकूण 44 मृतदेहाचे अवशेष आढळून आले. अचानक आलेल्या एखाद्या अपत्तीमुळे सर्वांचा मृत्यू झाल्याप्रमाणे शरीरे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेलेली असावीत हे जाणवत होते. एके ठिकाणी आई, वडील व लहान मुलगा हातात हात घालून रस्त्यावरून जातानाच एकत्र कोसळून पडले असवेत असे तीन देह पडले होते. जसेच्या तसे. पण  जंगली श्वापदांनी त्यांना खाल्ले कसे नाही?
असे काय झाले की सर्वजण अचानक मृत्यू पावले. मुळात म्हणजे हा भाग ज्वालामुखी होण्यासारखा मुळीच नाही. मग काय झाले असावे? रशियन संशोधकाच्या मते या शरीरातील रेडीओ अॅक्टिव किरणांचे प्रमाण हिरोशिमा नागासाकीतील मृतदेहापेक्षा जास्त होते. म्हणजे कदाचित अणूयुद्धासारखेच काहीतरी. या भागात सापडलेली भांडी हल्लीच्या टाईल्ससारखी कठीण आहेत. अन त्यासाठी लागणारी प्रचंड उष्णता अणूबॉम्ब नंतर नक्कीच तयार होते….

3. जोधपुरमधील रेडीओ अॅक्टिव राख :

प्राचीन इंडस खोरे हे आताचे राजस्थानचे थरचे वाळवंट. रामराज्याचा काही भाग याच प्रदेशात. जोधपुरपासून पश्चिमेस दहा मैलावर असलेल्या एका ठिकाणी संशोधकाना प्रचंड प्रमाणात रेडीओ अॅक्टिव राखेचा थर दिसून आला आहे. साधारणपणे तीन चौरस मैलाचा हा प्रदेश एकेकाळी तेथे अणूयुध्द होवून गेले असेल याची शंका देवून जातो. याच भागातील लोकांमध्ये जन्मजात शारिरीक वैगुण्य असलेली अनेक उदाहरणे ज्ञात आहेत. जपानवरील हल्ल्यानंतर तेथेसूद्धा शारीरिक व्यंग्य घेऊन बालके जन्मली हे तुम्हास माहीतच असेल. सध्या तो भाग सरकारी नियमानुसार मानवी हालचालीस व्रज आहे. काही संशोधकाच्या मते या भागात 8000 ते 12000 वर्षांपूर्वी जपानवर टाकलेल्या अणुबॉम्ब इतक्या ताकदीचा बॉम्बस्फोट झाला होता.

4. उल्केचा नामोनिशाणा नसलेले लोणार सरोवर :

महाराष्ट्रातील लोणार सरोवराबद्दल आपणास माहित असलेली गोष्ट म्हणजे तो एक उल्कापातामुळे पडलेला खड्डा इतकीच. पण सुमारे 2154 मिटरचा व्यास असलेला हा खड्डा ज्या कोणत्या उल्केमुळे पडला त्याचे नामोनिशाणही तेथे सापडत नाही हे मात्र आपणास माहित नाही. 50000 हजार वर्षापूर्वी पडलेला हा खड्डा अणुबॉम्बशी रिलेटेड काही प्रकार असावा का असे वाटणाऱ्या काही शंका संशोधकांना पडल्या आहेत. बासाल्ट खडकात पडलेला हा जगातील एकमेव खड्डा आहे. उल्का काही खाली कोणता दगड आहे हे पाहून पडत नाही हे जरी मान्य केले तरी त्या उल्केचे काहीतरी अवशेष जवळपासच्या भागात का दिसत नाहीत हे कोडेच. डॉ. डेव्हिड चील्ड्रेस असे लिहतात की सरोवराची जर तुम्ही शाळेत शिकला ती लिटमस टेस्ट केली तर तुम्हाला असे दिसून येईल की दोन वेगवेगळे रिझल्ट येतात. वरील भाग न्युट्रल (ph 7) व आतील भाग अल्कलाइन (ph 11) आहे. आणि दोन्ही मिसळत नाहीत. अश्या कोणत्या प्रयोगाने हे साध्य केले असेल?

5. डॉ. ओपेन्हीमर यांची भगवत गीता :

पहिल्या अणू चाचणीनंतर “मॅनहटन प्रोजेक्ट”चे प्रमुख डॉ. जे. रॉबर्ट ओपेन्हीमर यांना या अणू चाचणीबद्दल विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर कदाचित प्राचीन भारतीय  संशोधनाबद्दल त्यांना आदर व जाणीव आहे असे दाखवून देते. त्यांनी भगवत गीतेचा आधार घेत गीतेमधील युद्धातील एक वाक्य सांगितले. ““Now I am become Death, the Destroyer of Worlds.” मलाही असेच वाटायला लागले आहे असे ते म्हणाले. सात वर्षांनी त्यांनी अणुबॉम्बची माहिती व वापर प्राचीन भारतात झाला असावा असे उद्गार रोचेस्टर विद्यापीठातील मुलाखतीत काढले. त्यांनी त्यावेळी दिलेले पुरावे जपानमधील अणुयुध्द हे पहिले अणुयुध्द नव्हते याकडेच इशारा करतात.
संदर्भ: वेद.विकीडॉट.कॉम

1,269 total views, 2 views today