मानवाचा ज्ञात इतिहास फार थोडा आहे. अज्ञात अतिप्राचीन काळी आपण कोण होतो किंवा त्याकाळी पृथ्वीवर कोण राज्य करीत होते हे अजूनही कोडे आहे. आता पहा ही स्मार्ट दोस्तची यादी. जगभरातील गूढ आकृत्या ज्या कोणी काढल्या व कोणासाठी हे आजअखेर कोणासही समजले नाही. अतिप्रचंड गूढ आकृत्या ज्या फक्त अवकाशातूनच दिसू शकतात.

 

१) नझाका (NAZCA) लाईन्स

दक्षिण पेरुच्या वाळवंटी प्रदेशात आढळून आलेल्या या शेकडो कोरीव आकृत्या अंतराळातील देवांना खुष करण्यासाठी किंवा कदाचित त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बनवलेल्या या आकृत्यामध्ये विचित्र प्राणी, पक्षी आणि अंतराळीवर दिसून येतात. फक्त अवकाशातूनच बघता येणारी ही गूढ कलाकृती विमानतळ कोठे आहे हे तर दाखवत नसेल?

२) मारीमॅन

ऑस्ट्रेलियन पठारावर दिसून येणारी ही पक्षीमानव आकृती अगदी अलिकडे म्हणजे १९९८ साली अवकाशातून दिसून आलेली ही आकृती. हातामध्ये आयुध, एखाद्या पक्षाचा चेहरा असणारी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची प्रचंड आणि गूढरम्य आकृती.

३) यूफिंग्टन

ऑकसफर्डशायर परगण्यातील इंग्लंडमधील कलाकृती. टेकड्यांमधील नैसर्गिक खोलगट भाग पांढऱ्या पावडरने भरुन तयार केलेली आकृती. कांस्य युगातील प्रगल्भता दाखवते. गंमत म्हणजे ही आकृतीसुध्दा फक्त विमानातून दिसून येते. म्हणजे जमिनीवर हे चित्र तयार करताना कोणीतर आकाशातून डायरेक्शन दिले असतील का?

४) पराकासचे त्रिशूळ

पेरु देशातील पराकास प्रदेशातील डोंगरावर काढलेले भले मोठे त्रिशुल. अनेक मैलांवरुन जमिनीवरुन सुध्दा दिसणारे हे त्रिशुल परग्रहावरील संस्कृतींना खुणावत तरी नसेल? १९३२ साली विमानातून अपघातानेच दिसून आलेली ह्या त्रिशुलाचे गूढ अजूनही उलगडले नाही.

५) अॅटाकामा महामानव

सुमारे ३१० फुटाची चिली देशातील ही महामानवाची आकृती. डोंगर कड्यांवर कोरीव काम करुन काढलेली आकृती एखाद्या प्रचलित देवाची असेल असे म्हटले जाते. काहींच्या मते ३५०० वर्षांपूर्वी परग्रहवासी यांच्या आठवणी म्हणून ही आकृती काढली आहे असे दिसून येते.

741 total views, 1 views today