आर्नोल्डचा हा पन्नास वर्षांपूर्वीचा सन 1967 मधील फोटो. आजूबाजूला अंगभरून कपडे परिधान केलेल्या मुली, माणसे अन त्यात हा चक्क किरकोळ अंगवस्त्रात. गोष्टीतल्या “चड्डी पहनके” घुमणारा मोगली सारखा. हा असा काय फिरतोय असा प्रश्न त्याकाळीसुद्धा पडलाय हे ही काही माणसांच्या हावभावातून दिसतंय. एका छायाचित्रकाराने कैद केलेला फोटो त्याकाळी खूप गाजला.

बाब अशी होती की वीस वर्षाचा आर्नोल्ड लहान वयात त्याच्या या फिजीकमुळे प्रसिद्ध झाला होता. मिस्टर युनिव्हर्स हा किताब मिळवणारा जगातला सर्वात लहान वयाचा आर्नोल्डला स्वतःची जिम सुरु करायची होती. अन त्यासाठी त्याने जर्मनीतील म्युनिच शहराची निवड केली. पण कमी पैशात जाहिरात कशी करायची या विचारातून त्याने स्वतःच गावभर उघडे (चित्रात दाखवले त्याप्रमाणे) फिरायचे ठरवले. त्याच्या या उद्योगातून जिमचा उद्योग फळफळला का हे माहित नाही. पण अनेकाना नजरसुख मिळाले असे वाटत कारण कोणीच त्याच्या या पदयात्रेला हरकत घेतली नाही. अगदी त्याकाळी…सुद्धा.

520 total views, 3 views today