जगाच्या प्रत्येक भागात स्वतःचे असे एक कल्चर असते, काही समजुती, प्रथा आणी परंपरांनी तिथले लोक एकत्रित झाले असतात. या सर्वांना जोडणारा दुवा त्या भागातील पौराणिक कथांमध्ये सापडतो. या पौराणिक कथांमध्ये अनेकवेळा काही विचित्र वाटणाऱ्या प्राण्यांचा उल्लेख केला असतो. हे प्राणी/मानव चांगले/वाईट काम करताना दाखवले जातात. कथांमधील या प्राण्यांचे शरीर वेगवेगळ्या अनेक प्राण्यांच्या अवयवांना जोडून तयार झालेले असेते. मग त्यामध्ये पक्षांचे डोके व प्राण्यांचे शरीर वा प्राण्यांचे डोके व मानवाचे शरीर वा मानवाचे डोके व पक्षांचे शरीर वा …….. किती कॉम्बिनेशन्स ?
तर दोस्तांनो अशाच देशोदेशींच्या अर्धमानवांची यादी स्मार्टदोस्तने बनवली आहे. असे अर्धवट प्राणी हजारोंनी सापडले. परंतु यादीत फक्त पाचजणच. (म्हणजे अर्धमानवांची अर्धयादी)

1. बकरा :

अर्धे शरीर मानवाचे आणी उर्वरित भाग बकऱ्याचा असणारे काही पौराणिक अर्धमानव काही परदेशी सौंस्कृतीत आढळतात. फाऊन हा रोमन कथांमधील जंगलाचा राजा बकऱ्याचे शरीर व माणसाचे डोके घेवून वावरताना दिसतो. ग्रीक कथांमध्ये फाऊन सारखाच पॅन नावाचा धनगरांचा देव मेंढ्यांच्या कळपाचे रक्षण करताना दाखवला आहे. त्याचा सहकारी स्टायरस देखील ग्रीकांसाठी तेच कार्य करतो. ग्रीक पुराण कथांमध्ये सिलेनस या नावाचा अजून एक कोपिष्ट देव आहे जो जंगलात असतो व तांडव नृत्य करू शकतो. या सर्व देवांचे धड बकऱ्याचे असते हे वर सांगितलेच परंतू हिंदू पुराणकथांमधील दक्ष या देव पुत्राचे जेव्हा शीर धडावेगळे केले गेले तेव्हा त्याला बकऱ्याचे डोके प्राप्त झाले अशी नोंद आहे.

2. पक्षी :

काही अर्ध मानवांना प्राण्यांएैवजी पक्षांचेसूद्धा बॉडीपार्टस होते हे पुराणकथावरून लक्षात येते. हर्पिस या राक्षशिणी पक्षांचे शरीर व स्त्रीचे तोंड घेवून ग्रीक व रोमन पुराण कथांमध्ये वावरत होते. ज्यू कथांमध्ये लिलीथ ही वाईट काम करणारी स्त्री, पक्षांचे पंख व पाय घेवून भय निर्माण करायची. सायरन अर्धस्त्री पक्षी व स्त्री यांचे कॉम्बिनेशन म्हणून रोमन कथांमध्ये आहे. याच सायरनचे रशियन रूप म्हणजे सिरेन व अल्कोनोस्त. या तिघीकडे गाण्याची अजब कला आहे ज्यामुळे ऐकणारा सर्व जग विसरून या अमानवी स्त्रियांकडे आकर्षित होतो. रशियन  कथांमध्येच ग्यामून या अर्धपक्षीस्त्रीचा उल्लेख आहे पण ही पक्षीस्त्री वाईट कामासाठी नव्हे तर चांगल्या कामासाठी प्रसिध्द आहे. जापनीज बुद्ध कथांमध्ये करुरा, हिंदू पुराणकथांमढील गरुडा अशी बरीच नावे अर्धमानवाच्या पक्षी रुपात आपल्याला सापडतात.

3. मस्य :

मासा आणी मनुष्य यांच्या संयुक्त रूपातील अनेक उदाहरणे तुम्हाआम्हाला माहित आहेत. मस्यकन्यां किंवा मस्यपुरुष अश्या स्वरूपात वावरताना, चांगले वाईट काम करताना यांना आशियायी, आफ्रिकन तसेच अतिपूर्वेकडील देशांमध्ये रेखाटले आहे. मस्य रूपातील मानवाचा पहिला उल्लेख सिरीयन प्राचीन कथांमध्ये अत्रागाटीस (Atargatis) नावाच्या देवीच्या रुपात सापडतो. अत्रागाटीस स्वतःला मस्यकंन्या बनवू शकत असे. ट्रायटन हा ग्रीक कथांमधील समुद्राच्या राजाचे शरीर कंबरेपासून खाली माश्यांसारखे खवलेदार आहे तर वरील भाग पुरुषाचा. बायबलमध्येसुद्धा मस्य अवतारातील अर्धमानवाचा उल्लेख आहे. भगवान विष्णूच्या मस्य अवताराबद्दल तर आपण जाणतोच.

4. सर्प :

सर्प अवतारातसूद्धा अर्ध्मांवे होते असे लिखाण अनेक पुराण कथांमध्ये आहे. हिंदू पुराण कथांमध्ये केतू या असुराचे अर्धे शरीर भयंकर सापासारखे होते. ग्रीक कथांमधील राक्षसांचे भयानक रूप म्हणजे एचीद्ना (Echidna). एचीद्नाच्या अतिसुंदर चेहऱ्याला जोड होती सापाच्या शरीराची. चिनी सुस्कृंतीतील नुवा व फु झी या भावंडातील नुवा सर्पकन्या तर फु झी सर्पचिरंजीव. गुर्गोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थेनो, युर्याले आणी मेडूसा या तीन बहिणींना डोक्यावर केसांएैवजी सापच होते तर अनोख्या हातीबव्री ड्रगाँनला डोके साप्चे व शरीर माणसाचे. हा हातीबव्री इजिप्तचा.

5. सिंह :

बकरा, मासा, पक्षी असे तिन्ही लोकातील जीव देव/दानव रूपात असताना प्राण्यांचा राजा सिंह कसा मागे राहील? जगाच्या पाठीवर अनेक पुराण कथांमध्ये सिंह रूपातील अर्ध मानव आपल्याला पहावयास मिळतात. प्रसिध्द इजिप्शियन स्फिंक्सला मानवाचे शीर व सिंहाचे धड होते हे सर्वांना माहित असेलच. स्फिंक्सचेच पेर्शियन व्हर्जन म्हणजे मॅंटीकोर. सिरियातील रक्षणकर्ता देव लाम्यासूचे शरीर सिंहाचे, डोके मनुष्याचे अन पंख गरुडाचे. नरसिंह रूपातील विष्णूचे शीर व नखे सिंहाची, शरीर मानवाचे होते हे माहीतच आहे.
तर दोस्तांनो अर्धमानवांची यादी येथेच संपवतो. पण माहित असू दे बैल, कुत्रा, घोडा अश्या अनेक जीवांपासून अर्धमानव बनले होते. अधिक जानकारी के लिये नेट सर्च करो….

823 total views, 3 views today