अँड्रॉइड यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी. गुगलने लेटेस्ट अँड्रॉइड वर्जन 5.0 लॉलीपॉपमध्ये नवे फीचर्स अपडेट केले आहेत. ‘स्टेबिलिटी’ आणि ‘परफॉर्मंस’ वाढवणाऱ्या या फीचर्सबद्दल तुम्हाला नक्कीच जाणून घेण्याची इच्छा असेल. म्हणूनच स्मार्टदोस्त तुम्हाला सांगणार आहे लॉलीपॉपची 5 अनोखी फीचर्स..

1. स्मार्ट नॉटिफिकेशन

अँड्रॉइड 5.0 मध्ये स्मार्ट नोटीफिकेशन देण्यात आले आहेत. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही सर्व नोटीफिकेशन जेव्हा पाहिजे तेव्हा बंद ठेवू शकता. यासाठी ‘Until Next Alarm’ हा ऑप्शन बनवण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्सला झोपेदरम्यान कोणत्याच प्रकारचा डिस्टर्ब होणार नाही आणि जेव्हा आलार्म वाजेल तेव्हा सर्व नोटीफिकेशन आपोआप सुरू होतील. यामध्ये तीन मोड देण्यात आले आहे. नोबडी, प्रायोरिटी आणि ऑल. या मोड्सवर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे नोटिफिकेशन सेट करू शकता. आवश्यक असणारे नोटीफिकेशन तुम्ही चालू ठेवून नको ते बंद करू शकता.

2. साइलंट मोड रिटर्न्स

गुगलने चांगले फीचर्स आणि डिझाईन अपडेटसोबतच अँड्रॉइडमध्ये सायलेंट मोडचा उपयोग केला आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही सायलंट मोड अॅक्टीव्ह कराल तेव्हा तुमच्या फोनमध्ये असलेला LED वेगवेळ्या रंगाने तुम्हाला त्याची माहिती देईल. एवढेच नव्हेतर, या दरम्यान कोणत्याच प्रकारचा आवाज येणार नाही.

3. क्रॅपी वाय-फाय नाही

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उदा. विमानतळ, रेस्त्रा, शॉपिंग मॉलमध्ये जेव्हा तुम्ही वाय-फाय सिग्नलवरून इंटरनेट कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, तर ते फारच वैताग आणणारे असते. तुम्हाला नेहमी वाटते की, रेंज येत आहे, मात्र ते फ्री वाय-फाय काम करत नाही. अशा प्रसंगासाठी अँड्रॉईड 5.1 मध्ये उपाय शोधला आले. आता ज्या ठिकाणी कमी रेंज असेल आणि तेथे तुम्ही इंटरनेट कनेक्ट करत असाल, तर तुमचा तेव्हा तुमचा स्मार्टफोन तुम्हाला याबद्दल सांगेल. सोबतच भविष्यात ऑटो-कनेक्ट करू नका असेही सांगेल. हे फीचर छोटे असले तरी कामाचे आहे.

4. सेफ ब्राउसिंग

यामध्ये अनवाँटेड वाय-फाय नेटवर्कपासून वाचण्याची सुवीधा आहे. गूगल VPN सर्विसवर काम करते, जे सेफ नेटवर्कवर काम करते. तुमचा डाटा गुगल VPN द्वारे सुरक्षित असतो. हे फीचर गुगल नेक्सस 6 ला लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. या अॅपबद्दल असे सांगण्यात येते की, “हे तुमच्या ओपन वाय-फायला सुरक्षित ठेवते.

5. चोरांपासून सुरक्षित

गुगलच्या एँटी-थीफ गेमलासुध्दा अपडेट करण्यात आले आहे, विशेषकरून नेक्सस 6 आणि नेक्सस 9 तुलनेत. अंड्रॉईड टू अंड्रॉईड पोलिसांच्या नावाचे हे अँटी-थीफ फीचर टाकण्यात आले आहे. यामुळे एखाद्या चोराला तुमचे प्रायमरी अकाऊंट मिटवणे अवघड होईल. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास या फीचरमुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित झाला आहे.

567 total views, 1 views today