अनेकवेळा प्रेमिकांना लव्हलाईफमध्ये बर्याच वेळा अडचणींना सामोरे जावे लागते. आपले लव्हलाईफ सतत चांगले, आनंदी असावे असे वाटणार्यांसाठी ४ स्मार्ट तत्वे : लक्षात असुदे की प्रेमिकांच्या व्याख्येत मिस्टर आणि त्यांच्या मिसेस देखील येतात.

१) एकमेकांसाठी वेळ द्या

एकमेकांसाठी पुरेसा वेळ न दिल्याने अनेकदा कटुता निर्माण होती. आठवड्यातील किमान एक दिवस एकमेकांसाठी रिकामा ठेवा. तुमचा जॉब, मित्र, मुले यांच्यात गुंतून राहताना तुमच्या पार्टनरसाठी वेळ देणे तुम्ही विसरुन जात असाल तर तसे न करता थोडा फक्त पार्टनरसाठीच असा वेळ जरुर द्या. एक दिवस नसेल तर काही तास तरी एकत्र घालवा.

२) रुल्स ठरवा

कौटुंबिक जबाबदार्यांची पुरेसी जाणीव एकमेकांना असणे ही सुखी लव्हलाईफची जरुरी आहे. फक्त एकावरच कौटुंबिक कामाचे ओझे व त्याची पार्टनरला नसणारी जाणीव घातक ठरू शकते. तेव्हा कामे वाटा, रुल्स ठरवा. पाणी कोणी भरायचे, भाजी कोणी आणायची इ. सर्व ठरवा. रुल प्रमाणे वागा रिझल्ट मिळवा.

३) तुम्हाला पार्टनर महत्वाचा आहे हे जाणवून द्या

छोटया छोटया कृतीतून तुम्ही तुमचे पार्टनर विषयीचे प्रेम व्यक्त करु शकता. प्रेम मनात न ठेवता व्यक्त करा. एखादे ग्रिटींग कार्ड, अचानक दिलेली फुले लव्हलाईफमध्ये नक्कीच रंग भरतील. जरुर म्हणा, ’आय लव्ह यू’

४) गप्पा मारा

कामावरुन दमून आल्यावर टी.व्ही.समोर संध्याकाळी बसण्याचा रिवाज दोघांमध्ये दुरावा निर्माण करु शकतो. टी.व्ही.बघू नये असे नाही. परंतु एकमेकांशी संवाद साधणे महत्वाचे विषय छोटा जरी असला तरी गप्पा तुम्हाला नक्की जवळ आणतील. आणि हो! काही बाबतीत मते वेगळी जरी असली तरी बेडमध्ये जाताना सर्व विसरुन टाका.

763 total views, 1 views today