सकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात कडक चहा वा कॉफीने करणाऱ्या परंतु हेल्थचा पण विचार अधुनमधून करणाऱ्यासाठी ’स्मार्ट दोस्त’ ने शोधून काढलेली लिंबू पाण्याची किमया सांगणारी यादी. लिंबू म्हणजे न्युट्रीशियनने भरलेला एक छोटा बॉम्बच. ज्यामध्ये व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर असते. अन हो एखाद्या सफरचंद वा द्राक्षांपेक्षा जास्त पोटॅशियम लिंबामध्ये असते असेही आढळून आले आहे.

दोस्तहो.. लिंबू पाणी म्हणजे ग्लासभर शुध्द व कोमट पाणी ज्यामध्ये अर्धा लिंबाचा रस.. हे लक्षात असूद्या. नुसता लिंबू खाणे आपल्या दातांच्या इनॅमलला (आवरण) हानिकारक होवू शकते म्हणून लिंबूरस डायरेक्ट न पिता त्यामध्ये कोमात पाणी मिसळून पिणे योग्य. बरेच लोक जेवण झाल्यावर ताटातल्या लिंबाच्या फोडीला मीठ लावून तसेच तोंडात पिळतात, जे अयोग्य आहे.

लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळेल.

1. प्रतिकारशक्ती वाढते :

एक लिंबामध्ये इतके व्हिटॅमिन ’सी’ असते जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. श्वसन क्रियेतील काही दोष दुर करण्यास याचा उपयोग होतो. लिंबामध्ये अॅस्कॉर्बिक (ASCORBIC) अॅसिड असते जे शरीराला उपयोगी पडणारे लोह (IRON) मिळवण्यावर मदत करते. तुम्ही जेव्हा तणावात असता तेव्हा पहिली गोष्ट होते ती म्हणजे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन “सी” ची लेव्हल कमी होते. म्हणूनच डॉक्टर तुम्ही स्ट्रेसफूल असाल तर व्हिटॅमिन ’सी’ च्या गोळ्या खायला सांगतात. लिंबामध्ये भरपूर “सी” असते त्यामुळे स्ट्रेस कमी अन प्रतिकारशक्ती जास्त व्हायला मदत होते.

2. इनर्जी बुस्टर :

लिंबू पाणी पचनक्रियेस मदत करते. नैराश्य कमी करुन उत्साह वाढवण्यास लिंबू पाण्याचा उपयोग होतो. फक्त लिंबाचा वासदेखील आपणास ताजेतवाने करतो हे माहितच आहे. त्याचबरोबर अपचनामुळे होणारी जळजळ, नकोश्या ढेकर लिंबूपाणीमुळे कमी होतात.

3. डीटॉक्स :

दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने केल्यास रात्रभर पचनमार्गात जमा झालेले टॉक्सिन्स (विषारी तत्वे) दुर होते. पचनवाढीस त्याचा उपयोग होतो. लिंबामधील सायट्रसमुळे लिव्हर शुध्दीकरण होते. पेप्टीक अल्सर होण्याचा धोकाही कमी होतो. लिंबामध्ये पेक्टिन फायबर्स (Pectin Fiber) असतात ज्यामुळे अतीव (नको असणारी) भूक कमी होवून वजन कमी व्हायला मदत होते. तसेच लिंबूपाण्याचे नियमित सेवन अॅसीडीटी कमी करते. सांध्यातले युरीक अॅसीडचे प्रमाण कमी करण्याससुद्धा याचा उपयोग होतो.

4. जखमा लवकर भरुन येतात :

लिंबू पाण्यातील व्हिटॅमिन्समुळे जखमा लवकर भरुन येण्यास व स्ट्रेस कमी होण्यास मदत होते हे दिसून आले आहे. दातदुखीपासून रिलीफ मिळण्यासाठी लिंबूपाण्याचा उपयोग होतो. पण वर सांगितल्या प्रमाणे लिंबू डायल्युट करून म्हणजे त्यात पाणी (शक्यतो कोमट) मिसळून पिणे गरजेचे.

5. सुंदर त्वचा मिळते :

वातावरणातील अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे होणारे अनेक दुष्परिणाम लिंबू पाण्यामुळे कमी होतात. लिंबू पाण्यातील अॅन्टीऑक्सीडंटसमुळे त्वचेच्या सुरकुत्या, डाग कमी होण्यास मदत होते. लिंबूपाण्यामुळे रक्तातील विषारी तत्वे कमी होण्यास मदत होते. जेणेकरून त्वचेचा ग्लो वाढतो.

6,218 total views, 4 views today