क्रिकेट आणि आपले अतूट आणि अनोखे नाते. २०/२० असो वा वन डे आणि टेस्ट, सर्वांची अप टू डेट माहिती ठेवणारे डाय हार्ड क्रिकेट फॅन आपल्या आजूबाजूला शेकड्यांनी मिळतात. क्रिकेटमध्ये अनेक आगळे वेगळे रेकॉर्ड्स आणि मजेशीर प्रसंग सतत होत असतात. त्यामध्ये अल्यूमिनियमची बॅट घेवून फलंदाजाची खरोखरची एन्ट्री असो वा डॉन ब्रॅडमन एका हातानेसुद्धा इंग्लंडविरुद्ध धावा काढू शकतो अशी १९३२-३३ सालची अफवा असो. क्रिकेटमध्ये सतत काहीतरी नवीन घडत असते. यातीलच काही मजेशीर आणी वाचनीय गोष्टींची ही स्मार्टदोस्त यादी.
सचिन देवाचे रेकॉर्ड्स तोंडपाठ असणाऱ्यासाठी आणी नसणाऱ्यासाठी स्मार्टदोस्तची वेगळी यादी.

1. डेनिस लिलीची अल्यूमिनियमची बॅट:

१९७९ च्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड दरम्यानच्या अॅशेस मालिकेतील प्रसंग. पर्थ मधील सामन्यात डेनिस लिली जेव्हा खेळायला आला तेव्हा त्याच्या हातात काय आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. पठ्ठ्याने तीन रन्स काढल्याही. तेव्हा बॉलरच्या लक्षात आले कि बॉलचा आकार बदलत आहे. चौकशी केल्यावर लक्षात आले, बॅट लाकडाची नसून अल्यूमिनियमची आहे. बराचसा वादविवाद झाला परंतु लीलीने बॅट बदलण्यास नकार दिला. अखेर लिलीच्या कॅप्टनने म्हणजे इयान चॅपेलने लाकडी बॅट मैदानात पाठवली आणि वाद थांबला.
गम्मत म्हणजे तोपर्यंत बॅट कशापासून बनवायची याचे कोणतही ठोस नियम अस्तित्वात नव्हते. ते नियम आजही नसते तर रेम्याडोक्याच्या ख्रिस गेलने मंगळावरच बॉल पाठवले असते…..

2. सॉरी यू आर लेट… आत तुम्ही आउट!

कदचित माहित नसेल पण वेळेत पीचवर आला नाही तर फलंदाजाला आउट ठरवायचा “टाईम आउट” नियम टेस्टमध्येसुद्धा आहे. म्हणजे तो २०/२० मध्ये आहे हे आपण जाणतोच म्हणूनतर मैदानात डग- आउट्स असतात. परंतु कसोटी सामन्यातसुद्धा चार वेळा फलंदाज तीन मिनिटात पिचवर आला नाही म्हणून त्याला आउट दिले गेल्याची उदाहरणे आहेत. आसा रडीचा डाव शक्यतो कोणी खेळत नाही नाहीतर पाकच्या अति फास्ट (?) इंजमाम उल हकला सारखेच आउट व्हावे लागले असते…

3. केरी पॅकेरची बंडखोरी आणी क्रिकेट लीगचा उदय :

ऑस्ट्रेलिअन मेडिया सम्राट केरी पॅकर चॅनल नाईन न्यूज एजंसीचा मालक होता. ऑस्ट्रेलियाचे सर्व क्रिकेट सामने दाखवण्याचे हक्क आपल्याच टीव्ही चॅनलला मिळावेत हा त्याचा हट्ट. तशी त्याने ऑस्ट्रेलिअन क्रिकेट बोर्डाकडे मागणीही केली  परंतु त्याची ही मागणी ऑस्ट्रेलिअन बोर्डाने मान्य केली नाही. आपल्या श्रीमंतीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो असा गर्व असणाऱ्या केरीने प्रचंड पैसे ओतून जगातले टॉपचे खेळाडू जमवून स्वतःचे “वर्ल्ड क्रिकेट लीग” चालू केले. ही गोष्ट आहे सन १९७७ ची. केरीने क्रिकेटचा नक्षाच बदलला. हेल्मेट्सचा वापर, चीअर गर्ल्स, आतषबाजी जे जे आपण आय. पी. एल. पाहतो ते ते सर्व तीस वर्षांपूर्वी केरीने पैशाच्या जोरावर जगाला करून दाखवले.

“वर्ल्ड क्रिकेट लीगचा” बोलबाला वाढू लागल्यावर शेवटी ऑस्ट्रेलिअन बोर्डाने केरीची मागणी मान्य केली आणि क्रिकेट सामने दाखवण्याचे हक्क चॅनल नाईनला दिले.

(भारतातपण झी ग्रुपने इंडियन क्रिकेट लीग सुरु केले होते. परंतु बोर्डाने हुशारी करून स्वतःचे आय. पी. एल. चालू केले हे आपण जाणतोच.)

4. भारताविरुद्ध २१व्या शतकात काढल्या गेलेल्या तीन सर्वोच्च धावांमागे इशांत शर्माचा हात होता :

वाचायला ऑड वाटेल पण हे सत्य आहे. अॅलिस्टर कुक (२९४ धावा- एडबस्तन सन २०११), मायकेल क्लार्क (३२९ धावा – सिडने २०१२) व ब्रेडन मॅकुलम (३०२ धावा – वेलिंग्टन २०१४) यांनी भारताविरुद्ध २१व्या शतकातील तीन सर्वोच्च धावसंख्या उभारल्या. आणि गम्मत म्हणजे तिन्ही वेळा इशांत शर्माने या परकीय खेळाडूंचे झेल त्यांच्या डावाच्या अगदी सुरवातीला सोडले आहेत. नंतर भारताविरुद्ध या तिन्ही खेळाडूंनी धावाच पाउस पाडला.
व्हॉट अ कोइंसीडन्स भिडू….

5. आजपर्यंत बावीस खेळाडूंनी दोन दोन देशांतर्फे अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे:

अंतरराष्ट्रीय टीमकडून क्रिकेट खेळायचे भाग्य मिळणे म्हणजे किती कठीण काम आहे हे सर्वांना माहितच आहे. परंतु जगात बावीस असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये दोन देशांना रीप्रेसेंट केले आहे. त्यातील १५ खेळाडूंनी दोन देशांकडून कसोटी सामने तर इतरांनी वन डे दोन देशांकडून खेळले आहेत. केप्लर वेस्ल तर साउथ आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या वन डे व कसोटी टीममध्येही होता.
सोबतच्या फोटोतील भारताचे सिनिअर नवाब पतौडी हे एकमेव असे खेळाडू आहेत जे भारत व इंग्लंड टीमकडून खेळले आहेत.
संदर्भ: इन.विकीपेडिया

508 total views, 1 views today