एका पायावर तासन तास उभे राहून जप करणारे साधू आपण पाहतोच. देवाचे नामस्मरण करत शरीराचे संतूलन केवळ एका पायावर करत स्तब्ध उभारले हे योगी आपणास वेगळ्या शक्तीची आठवण करून देतात. निसर्गाने सुध्दा असे चमत्कार करून दाखवले आहेत. केवळ थोड्याशा आधारावर वर्षानूवर्षे काही शिळा उन, वारा, पावसाचा आघात सहन करीत स्तब्ध उभ्या असलेल्या जगाच्या अनेक भागामध्ये दिसतात. स्मार्टदोस्तने अशाच अलौकीक संतूलन असणार्‍या शिळांविषयी माहिती मिळवली आहे.

१) नोव्हा स्कॉटीया, कॅनडा :

सुमारे ३० फूट उंचीची ही शिळा बॅसॉल्ट या प्रकारातील आहे. समुद्राकडे तोंड करून उभ्या असलेल्या एका योध्याप्रमाणे दिसणारी ही शिळा. आश्‍चर्य म्हणजे खालची बाजू अर्धी अधीक अधांतरी असून सुध्दा नोव्हा स्कॉटीयाची ही शिळा अजब संतूलन राखून आहे.

२) आयडॉल रॉक, उत्तर यॉर्कशायर, इंग्लंड :

जवळपास दोनशे टन वजन असणारी ही शिळा एका छोट्या पिरॅमीड सारख्या दिसणार्‍या दगडावर अधांतरी आहे. आश्‍चर्य म्हणजे आयडॉल रॉक भागात असे संतूलन असणारे अनेक दगड आपणास ५० एकरांमध्ये आढळून येतात. स्थानिक रहिवाश्यांनी त्यांना वॉचडॉग, टर्टल, डान्सींग बेअर अशी अनोखी नावे दिली आहेत.

३) एल टोरकॉल, स्पेन :

एल टोरकॉल डी ऍन्टेक्वेरा हे चूनखडीचे भले मोठे मनोरे आहेत. वर्षांनूवर्षे वाहणार्‍या हवेच्या झोतांमूळे या मनोर्‍यांना एकावर एक चपटे दगड ठेवल्यासारखा आकार आला आहे.

४) जेराबोल्टन, नॉर्वे:

दोन कड्यांचा मध्ये अडकून पडलेला ही जवळजवळ ५ चौरस मिटरची शिळा. जमिनीवर सूमारे एक हजार मिटरवर अडकून पडलेली ही अजस्त्र शिळा फारच थोड्या आधारावर संतूलन टिकवून आहे. या शिळेवर जायला बंदी नाही पण अट एकच खाली नजर टाकायची नाही. नाहीतर तुमचे संतूलन समाप्त.

५) मश्रूम रॉक, कन्सास, अमेरिका :

कन्सासच्या स्मोकी हील भागातील ही प्रसिध्द नैसर्गिक कलाकृती एखाद्या आळीवा प्रमाणे खांबांवर छत्री असणार्‍या अनेक शिळा येथे पहावयास मिळतात. डायनॉसॉरच्या जमान्यापासून उभ्या असणार्‍या या शिळा एक आवडते आकर्षण आहे.

614 total views, 1 views today