15 मे 2008 ला चौदा वर्षाच्या आरुषीचा थंड डोक्याने बेडरूम मध्ये, एखादा डॉक्टर ऑपरेशन करताना वापरतो तश्या शस्त्राने खून केला गेला…त्यांच्याच घरात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या हेमराज नावाच्या घरगड्याने आरुषीला मारले असा संशय आई वडिलांनी व्यक्त केला. परंतु दुसऱ्याच दिवशी टेरेसवर हेमराजचे पण मृत शरीर सापडले…म्हणजे खुनी हेमराज नव्हता तर कोणी दुसराच होता. परंतु ज्या रात्री घरात दोन खून झाले त्या रात्री घरात फक्त आरुषीचे डॉक्टर आई वडील होते. अन घराचे दरवाजे पण आतून बंद होते. मग दोन खून केले कुणी? Unsolved questions of Aarushi Murder Mystery..

नॉयडा पोलीस, सी.बी.आय. ज्या प्रश्नांचे उत्तर देवू शकले नाही अश्या जगावेगळ्या मर्डर मिस्टरीने समोर आलेले हे 5 प्रश्न..

1. बंद दरवाज्या आत दोन खून

आरुषी अन हेमराजचा ज्यावेळी खून झाले त्या रात्री नॉयडा मधील जलवायू अपार्टमेंटमध्ये फक्त चार माणसे हजर होती. आरुषी, तिचे वडील डॉ राजेश तलवार, आई डॉ नूपुर तलवार आणि त्यांचा घरगडी हेमराज. अपार्टमेंटच्या वरील मजल्यावरील हा फ्लॅट तब्बल 1300 चौरस फुटाचा ज्यामध्ये तीन बेडरूम, हेमराजसाठी सेपरेट रूम, हॉल व किचन. घराला तीन दरवाजे. सर्वात बाहेरील लोखंडी, त्यानंतर आणि एक मधला जाळीदार दरवाजा अन परत एक लाकडी मुख्य दरवाजा. (चित्र पहा)

15 तारखेला संध्याकाळी 7.45 ला डॉ. नुपूर हॉस्पिटल मधून घरी आली. 9.40 ला डॉ. राजेशला ड्रायव्हरने घरी सोडले अन गाडी पार्क करून किल्ली व बॅग द्यायला तो वर गेला. ड्रायव्हर उमेशने बॅग हेमराजला दिली. किल्ली राजेशला दिली. त्यावेळी त्याने आरुषी आई नुपूर बरोबर डायनिंग टेबल नजीक बसलेले त्याने पाहिलं. नंतर तिन्ही दरवाजे बंद झाले. म्हणजे घरामध्ये चार माणसे हजार होती. अन त्याच रात्री घरामध्ये चौघांपैकी दोघांचा खून झाला.

दुसऱ्या दिवशी 16 तारखेला पहाटे 6 वाजता घरकाम करणारी बाई भारती मंडल आली तेव्हा तिला सर्वात बाहेरील लोखंडी दरवाजा आतून बंद दिसला. जेव्हा तीने डोअर बेल वाजवली तेव्हा नुपूरने मधला दरवाज्याच्या जाळीतूनच तिच्याशी बोलणे केले. हेमराजने मधला दरवाजा बाहेरून बंद केला आहे असे नुपूरने सांगितले.

खरे काय होते हे अजूनही कोणालाच समजले नाही. परंतु भारतीच्या मते बाहेरील दरवाजा आतून बंद होता, नुपूर आतच होती अन दोन खून झाले होते.

नुपूरने खून केले का?

2. हॉलमधील स्कॉचची बाटली

राजेशने पोलिसांना सांगितले कि जेव्हा ते 16 तारखेला पहाटे जागे झाले तेव्हा नुपूर दरवाज्यात बोलत होती. नंतर हॉलमध्ये त्यांना एक स्कॉचची बॉटल दिसली. झोपण्यापूर्वी त्यांनी स्कॉचची बॉटल कपाटातून बाहेर काढली नव्हती. म्हणजे दुसऱ्या कोणीतरी रात्री हॉलमध्ये दारू पिली होती. आरुषीने हे काम केले का या शंकेने त्यांनी नुपुराला झोपलेल्या आरुषीला जागे करायला सांगितले. आरुषीची बेडरूम रात्री कायम आतून लॉक असायची. बेडरूमची किल्ली राजेश, नुपूरच्या बेड रूम मध्येच असायची. परंतु त्या पहाटे बेडरूमचा दरवाजा लॉक नव्हता अन आत आरुषीची डेड बॉडी बेडवर पडली होती असे ते म्हणाले. खरे काय ते दोघेच जाणो.

पोस्टमॉरटम मध्ये आरुषीने स्कॉच घेतली असे दिसले नाही. हेमराजच्या पोस्टमॉरटम मध्येसुद्धा त्याने स्कॉच घेतली होती असे दिसले नाही. म्हणजे रात्री कोणीतरी दुसरेच घरात स्कॉच प्यायले होते.

विशेष म्हणजे एकही ग्लास बाटलीच्या जवळपास नव्हता. अन पोलिसाना बाटलीवर दोन्ही मृत व्यक्तींचे रक्त अन काही फिंगरप्रिंट्स दिसून आले. फिंगरप्रिंट्स कोणाचे होते? रात्री अजून कोणी घरात आले होते का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

पोलिसांच्या मते राजेशने खून केले अन स्कॉच पिली. पण तसेच झाले असेल हे ते प्रुव्ह करू शकले नाही.

3. दोन बेडरूममधील दोन फुटाचे अंतर

दोस्तहो, आरुषी अन तिच्या आईवडिलांच्या बेडरूम मधील अंतर तुम्ही चित्रात बघीतलेच असेल. महज दो फिट का फैसला. परंतु त्यारात्री शेजारच्या रूम मध्ये मुलीचा खून होत असताना राजेश अन नुपूरने काहीच आवाज ऐकला नाही हे त्यांचे म्हणणे कोणालाही पाटण्या सारखे नव्हते. त्यातच राजेशने रात्री 11 वाजून 42 मिनिटाला एक मेल केला व 12.08 पर्यंत इन्टरनेट बघत होता हे त्याच्या नेटच्या रेकॉर्ड वरून सिध्द झाले.

पोस्टमॉरटमच्या रिपोर्टनुसार खून रात्री 12 ते 1 दरम्यान झाला.

राजेश नेट बघून दोन मिनिटातच असा कसा गाढ झोपला कि त्याला 15 – 20 मिनिटांनी दोन फुटावर चाललेल्या खुनाचा आजीबात आवाज आला नाही. हा प्रश्न कोड्यात टाकणारा.


4. इंटरनेट रात्रभर बंद चालू होणे

राजेश इंटरनेट बघत होता हे वर सांगितलेच. त्या रात्री 11 वाजता राजेशने नुपूरला इंटरनेट राउटर चालू करण्यास सांगितले. राउटरचा स्वीच आरुषीच्या रूममध्ये होता. आरुषी चेतन भगतचे थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ हे पुस्तक वाचत होती हे नुपूरने बघितलं. स्वीच चालू करून दरवाजा बंद करून नुपूर परत त्यांच्या बेडरूममध्ये गेली. परंतु त्याच रात्री इंटरनेटचा राउटरचा स्वीच परत बंद केला गेला होता हे पोलिसांनी सिध्द केले. उत्तर प्रदेश पॉवर कोर्पोरेशनच्या इंजिनिअरनी कोर्टात अशी साक्ष दिली कि त्या रात्री वीज कधीच खंडित झाली नाही. म्हणजे राउटर वीज गेल्यामुळे बंद झाला नव्हता.

याचा अर्थ रात्री परत कोणीतरी आरुषीच्या रूममध्ये गेले होते. किल्लीचा वापर करून राजेश, नुपूर गेले होते का हेमराजला आरुषीने दरवाजा उघडून आत घेतले होते हा प्रश्नच…

विचित्र गोष्ट अशी कि आरुषीला तिच्या अनमोल नावाच्या मित्राने रात्री अनेकवेळा फोन करायचा प्रयत्न केला पण तो कॉल उचललाच गेला नाही. तिचा फोन रात्री 9.08 पर्यंत चालू होता. काही दिवसांनी एका गटारीत आरुषीचा फोन सापडला. फोन गटारीत का अन कोणी टाकला ??

5. स्वच्छ बेड्शीट, उशी अन तलवार

16 तारखेच्या पहाटे जेव्हा कामवाली भारती जेव्हा आली तेव्हा दार आतून बंद होते हे वर सांगितलेच. काही मिनिटात दुसरीकडे जावून परत ती तलवार यांच्या घरी आली तेव्हा मात्र नुसते ढकलले तरी दोन्ही दरवाजे उघडले गेले. तिने घरात प्रवेश केला तेव्हा तिला राजेश व नुपूर रडताना दिसले. आत आरुषीचा खून झाला आहे हे त्यांनी सांगितले. परंतु दोघांच्याही कपड्यावर रक्ताचे डाग नव्हते. आपल्या मुलीच्या रक्ताने माखलेल्या शरीराला दोघांनीही जवळ केले नव्हते हे कोड्यात टाकणारे.

पोलीस लागेचच म्हणजे 8 वाजता तलवार यांच्या घरी पोहचले. त्यावेळी घरात जवळपास 20 लोक जमले होते. मिडीयावालेही दिसून येत होते. हेमराज घरात नव्हता अन रक्ताने चिंब झालेली आरुषी बेडवर निष्प्राण पडली होती. तिच्या कपड्याना रक्त लागले होते पण बेड्शीट, उशी अन जवळपासची स्टफ्ड टॉईज मात्र अगदी स्वच्छ होते.

खून केल्यावर कोणीतरी बेडशीट, उशी बदलून ठेवली होती का? उत्तर हो असेल तर कोणी..?

खुनाचा छडा लावायचाच या हेतूने पोलिसांनी तलवार यांची व त्यांच्या काही नोकरांची नार्को टेस्ट केली परंतु काही साध्य झाले नाही.

संशयाची सुई साहजिकच राजेश अन नुपूर यांच्यावर होती. परंतु अलाहाबाद हायकोर्टाने जिवंत राहिलेल्या राजेश अन नुपूर तलवार याना खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले अन मृत आरुषी अन हेमराजचा खून कोणी केला ही मिस्टरीच राहिली.

फक्त चारच माणसे घरात असताना त्यातीलच दोन माणसांचा खून होणे अन तरी सुद्धा कोणी खून केला हे कोणालाच न समजणे…हे जगाला पडलेले कोडे.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

1,847 total views, 11 views today