‘तुमच्यासाठी काही पण’ असे अनेक रिक्षांच्या व गाडीच्या मागे लिहण्याची एक क्रेझच मध्यंतरी होती. प्रत्यक्षात दुसऱ्यांसाठी आपण व आपणासाठी दूसरे किती, काय, कोण करते हा प्रश्न अनेकांना पडला असतो. असो! स्मार्टदोस्तने मात्र आईवर प्रचंड प्रेमअसणाऱ्या  व आईसाठी काहीपणम्हणणाऱ्या 5  बॉलीवूड स्टार्सची यादी बनवली आहे. लाखो मुली या स्टार्संवर फिदा असतील, पण हे स्टार्सतर ऑलरेडी त्यांच्या मम्मींवर फिदा आहेत. क्या जमाना है.

1. रणबीर कपूर :

लाखो दिलोंकी धडकन असणाऱ्या  रणबीरचे अनेक अफेअर्स असतीलही. रोज त्यांचे या हिरॉइनबरोबर लिंकींग आहे त्या हिरॉइन बरोबर ब्रेकअप झाले अशा अनेक अफवा आपण ऐकतो. परंतू सत्य एकच आणि ते सुध्दा सोनम कपूर म्हणजे त्याच्या बहिणीने सांगितले आहे. रणबीर पक्का आईभक्त आहे. अजुनसुध्दा आईकडून स्वत:ची नखे कापून घेण्यासारखे लाड तो पुरवून घेतो. मुली रणबीर भोवती पिंगा घालत असतील. अंतिम निर्णय मात्र मम्मीच्या हाती.

2. सलमान खान :

गेली अनेक वर्षे बॉलीवूड वर राज करणाऱ्या  सलमान वर मात्र आई सलमा खानच राज करते. मॅकोमॅन सलमान आईच्या फार जवळ आहे. आईची कोणतीही गोष्ट सलमान फार मन लावून ऐकतो. सलमानला चित्रकलेवर प्रेमसुध्दा आईमुळेच जडले. भले सलमान बद्दल बरेवाईट बोलले जाते परंतू त्याचे आईप्रेम वाखाणण्यासारखे. “मन गये मिय्या”

3. रणवीर सिंग :

बॉलीवूड मध्ये फक्त ४-५ वर्षापूर्वी आलेल्या रणवीर सिंगला लोक अनेक नावांनी ओळखतात. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘‘मम्माचा बॉय’’ रणवीरने आपण आईबरोबर सर्व शेअर करतो आणि कोणतीही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवत नाही, असे त्याने जाहिररीत्या कबूल केले आहे.

4. शाहीद कपूर:

शाहीद कपूरची करिअर भले वर खाली होत असेल. परंतु ह्या लोकप्रिय स्टारची एक गोष्ट मात्र कधीही कमी होत नाही. ते म्हणजे त्याचे आईवरचे प्रेम. शाहीद भले ‘रोल’ लाइफ मध्ये अनेक चांगल्या वाईट भूमिका करत असेल परंतू ‘रिअल’ लाइफमध्ये तो ‘आदर्शबेटा’ म्हणूनच प्रसिध्द आहे.

5.जॉन अब्राहम :

बिपाशा बरोबरच्या  ब्रेकअप नंतर भले जॉनचे नाव इतरांबरोबर जोडले जात असेल परंतु जॉनच्या आयुष्यात एक स्त्री पहिल्यापासूनच आहे. ती म्हणजे जॉनची आई फिरोजा इराणी. फक्त आठवण येती म्हणून अमेरिकेतून विमानाने आईला भेटण्यास येणारा जॉन प्रत्येक निर्णयातआईची  मदत घेतो. जॉनची कहाणी एखाद्या चीत्रपटासारखीच आहे. या 5 जणांसारखेचअभिषेकबच्चन,  करण जोहर हे देखीलआईभक्तआहेत. हे हीलक्षातअसू द्या. तर म्हणा आईसाठी काहीपण!

506 total views, 1 views today