“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…” शरीराने मोठे झाल्यावरही कधीकधी मन उगीचच लहानपणात जाते. थ्री बीएचकेमध्ये एैशो आरामात जगताना छोटेपणी बेडशीट अडकवून तयार केलेले इत्तुसे घरटे किती कम्फर्टेबल होते हे आठवून कस..स होतं. भातुकलीतील ती नखाएवढी भांडी.. अन ती झिपाऱ्या केसाची बाहुली..

ओह नो.. हे जास्तच सेंटी व्हायला लागलय. परंतु दोस्तहो “वसुदेव कुटुंबकम..” म्हणत सारे जगच एक कुटुंब आहे असे समजले तर या जागोजागी विखुरलेल्या जागतिक कुटुंबात भातुकलीचा खेळ मात्र सारखेपणानेच खेळला जातो. नखाएवढी भांडी.. अन त्या झिपाऱ्या केसांच्या बाहुल्याही इतरत्रही असतात.. बार्बी नावाच्या बाहुल्या त्यांच्या क्युटनेस बद्दल फार प्रसिध्द. बहुतेक बार्बीज नॉर्मल असतात तर काही एकदम अबनॉर्मल… काही काही म्हाताऱ्या तर काही पक्क्या दारुड्या.. चला तर बघूया 5 विचित्र बार्बीज.

1. प्रेग्नंट बार्बी :

“मेटल” (Mattle) कंपनीने जगाला पहिली बार्बी भेट दिली ते 1959 सालीच. जवळपास साठ वर्षं होत आली पण मोठ्या डोळ्याच्या या स्ट्रेट केसवाल्या चिमुकलीने जगाला जे वेड लावले ते आजतागायत टिकून आहे. तिच्या “केन” या नावाच्या नवाऱ्याचेही मध्ये आगमन झाले. तिच्यासाठी कंपनीने घर व इतर रुखवतात मांडतात तसे कंगवा, आरसा असे साहित्यही बाजारात आणले…

परंतु सर्व काही कुशल मंगल चालले असताना मध्ये मध्ये ही मेटल कंपनी मेंटल झाल्यासारखी वागते अन काहीश्या विचित्र बार्बीजना जन्म देते. अशीच एक म्हणजे प्रेगनंट बार्बी. या बार्बी बरोबर खेळताना छोट्यांनी काय शिकायचे हे देव जाणे…

2. खादाड बार्बी :

अचानक एकदा ही सडपातळ बार्बी एकदम जाडी झालेली जगाला दिसली. पुछताच करने के बाद पता चला की एक अॅड के लिये बार्बी को जाडा बनाया है. “अॅक्टीव लाईफ मुव्हमेंट” या समाजसेवी संस्थेसाठी, फिटनेसचे महत्व समजावून सांगणाऱ्या जाहिरातीसाठी काही बार्बिजना वजन वाढवावे लागले. हे सर्व काही काळासाठीच होते.

3. व्हीलचेअर बार्बी :

सन 1997 ला मेटलने बार्बीच्या “बेकी” नावाच्या फ्रेंडला चक्क व्हीलचेअरसहित बाजारात आणले. आयडिया तशी वाईट नव्हती परंतू एके दिवशी एका खरोखरच्या चिमुकलीने केलेल्या तक्रारीने बेकीचे आयुष्य संपुष्टात आले. बेकी तिच्या चेअरसहीत बार्बी बरोबर कंपनीने आधी विकलेल्या ड्रीम हाऊसमध्ये एकत्र मावू शकत नाहीत ही ती तक्रार. बेकीमुळे घरांची विक्री कमी होईल या भितीने बेकीची गच्छन्ती करण्यात आली.

4. ओरिओ बार्बी :

ओरिओ बिस्किटांच्या प्रमोशनसाठी एक डार्क स्कीनवाली बार्बी तयार करण्यात आली होती. “ब्लॅक ऑन आउटसाईड, व्हाईट ऑन इनसाईड” असा मेसेज देणारी ही बार्बी अमेरिकन-आफ्रिकन कम्युनिटीला पसंद पडली नाही अन या बार्बीचे छुमंतर झाले. ही पण 1997 ची गोष्ट.

5. वर्किंग मदर बार्बी :

जगात जस जशी सामाजिक स्थित्यंतरे होत गेली तसे रहन चलनही बदलत गेले. जबाबदाऱ्या बदलत गेल्या. अन या बदलत्या जगात मुलींवर, खेळात रमणाऱ्या या छोटूकल्यांवर बाहेर जाऊन नोकरी करण्याची वेळ आली. याच बदलात बार्बींजना देखील बदलावे लागले. “टर्लीन” नावाची ही अमेरिकेतील “वर्किंग मदर बार्बी” त्याचेच प्रमाण. एखाद्या पक्क्या अमेरिकन कामकऱ्या महिलेसारखी ही फकाफक सिगारेट्स ओढते, बिन बिबाह सात बच्चोकी ये माता और एक बच्चेको जन्म देणेवाली है. टर्लीन बहोत काम करती है और उसको “मदर ऑफ थे इअर” अवार्ड मिला है. अन गम्मत म्हणजे तिच्या बेंबी जवळ असणारे बटन दाबले तर ही पेदाड तुम्हाला “ज्ञानामृत” पाजते. जरा ऐका ती काय म्हणत आहे –

“माझ्या ग्लासात डबल दारू ओता.. मी दोघांसाठी पिणार आहे..”

दोस्तहो.. हा असला प्रकार बघितल्यावर असे वाटते आपली देसी… “बेबी डॉलच”.. बरी.

1,008 total views, 1 views today