चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे व त्यातून बऱ्याच वेळा शिकण्यासारखे काही नसते, तेव्हा शहाण्या माणसांनी सिनेमाच्या नादाला लागू नये असे अनेक लोक म्हणतात. आपले हिरो, हिरॉइन मौजमजा करणारे व कमी शिकलेले असतात असे सुध्दा अनेकांना वाटते. हा गैरसमज दूर करण्यासाठी उच्चशिक्षित कलाकारांची ’स्मार्टदोस्तने’ तयार केलेली यादी.

१) अमिताभ बच्चन

शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत सिरीयस असणारा आपला शहेनशहा सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड विद्यापीठाने त्याला सन्माननिय डॉक्टरेट ही पदवी देखील दिली आहे.

२) विद्या बालन

एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट असे लाइफसूत्र सांगणारी ’’ओ लाला’’ गर्ल विद्या सेंटझेवियर्स कॉलेजमधील बॅचलर्स पदवीधर आहे. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारी बालन विद्येत प्रवीण आहे असे दिसते.

३) जॉन अब्राहम

आपल्या हॉट बॉडीमुळे अनेकांना आवडणारा जॉन मुंबईच्या नरसी मूनजी कॉलेजमधून एमबीए झाला असून अर्थशास्त्रामधील पदवीधर आहे.

४) प्रिटी झिंटा

गुन्हेगारांचे मानसशास्त्र जाणणाऱ्या ’’क्रिमीनल सायकॉलॉजीमध्ये’’ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारी उच्चशिक्षीत प्रितीने शिमल्यामधील सेंट बेडस कॉलेजमधून इंग्रजीमधील पदवी घेतली आहे.

412 total views, 1 views today