जगातीक रेकॉर्डस म्हटले की काही तरी अचाट, अफाट ताकदीची कामे करावी लागतात. असाच काहीसा समज जगभर आहे. परंतु रेकॉर्ड कोणत्याही स्वरूपाचे असू शकते हे स्मार्टदोस्तला समजले आणि तयार झाली ही ५ अजब रेकॉर्डसची यादी.

1. पाठीवर फुगे फोडण्याचा विक्रम :

ज्युलीया गंथेल या जर्मनीच्या युवतीच्या नावावर असलेला हा विक्रम. केवळ १२ सेकंदात तीन फुगे पाठीवर फोडण्याचा पराक्रम करता करता आपण किती लवचीक आहे ते तिने दाखवून दिले.

2. पोटावर कलिंगडे फोडण्याचा विक्रम :

ज्युलीया सारखाच काहिसा विचित्र विक्रम जिम इंटर व सेलीया कर्टीस या ऑस्ट्रेलियाच्या जोडीने केला आहे. एका मिनिटात जिमने २५ कलिंगडे ज्युलियाच्या पोटावर ठेवून फोडली.. क्या बात है!

3. जिभेने वजन उचलण्याचा विक्रम :

हाताने वजन उचलणे हे फार कॉमन आहे, शरिराच्या विविध भागांचा वापर करून वजन उचलणाऱ्यांची लांबलचक यादीच गिनिजवाल्यांनी तयार केलेली आहे. त्यामध्ये जिभेला अडकवून तब्बल साडे बारा किलोचे वजन उचलण्याचा जिभपराक्रम इंग्लंडच्याच थाॅमस ब्लॅकथाॅर्न याच्या नावावर आहे.  भारतीय मनजीत सिंगने डोळ्याच्या पापण्यांना अडकवून १४ किलो वजन उचलल्याचीसुध्दा नोंद आहे.

वाचून चक्करच येतीय ना? मग पहा तर पुढचा चक्कर विक्रम…

4. पंख्यासारखे फिरण्याचा विक्रम :

जर्मनीच्या हे जियांगने तर कमालच केली. पॉवर ड्रिल मशीनचा वापर करून या पठ्ठयाने छताला लोंबकळत चक्क १४८ चकरा मारल्या. या घनच्चकर जियांगचे रेकॉर्ड नोंद करताना गिनीजवाल्या परीक्षकही चक्रावला असेल . ….

जागे आहात ना….. तर मग पळा… कारण पुढचा विक्रम पाळण्याचा …… आणी हो!…. पळण्याचासूद्धा

5. पाळणागाडी घेवून पळण्याचा विक्रम :

उचलायचे, फिरायचे, कापायचे असले विक्रम पाहिल्यामूळेच का कोणास ठावूक पण नॅन्सी शूब्रींग या आईला छोट्या मुलीला पाळणागाडीत घेऊन पळायचा विक्रम सुचला असेल. सुमारे १२ किमी अंतर फक्त १ तास ३० मिनीटे आणि ५१ सेकंदात धावून पार केले.

बिचाऱ्या छोट्या बाळाला आईचे हे वागणे बरे वाटले असेल का? तुम्हाला काय वाटते?

577 total views, 1 views today