प्रत्येकाला आपण एका शांत देशात रहावे असे वाटते. भारत शांतताप्रिय देश आहे हे सर्व जगाला माहित आहे. परंतु या देशात नेहमी कोणी ना कोणी अशांती पसरवायचे काम करते. स्मार्ट दोस्तने शांतताप्रिय तसेच शांत देशांची मिळवलेली यादी. ग्लोबल पिस इंडेक्सनुसार IEP संस्थेनी केलेली ही यादी.

१) डेन्मार्क

शांत व सुरक्षित देशांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवणारा डेन्मार्क दुसऱ्या जागतिक महायुध्दाच्या काळातसुध्दा शांत होता. वैशिष्ट म्हणजे त्या युध्दात राजधानी कोपनहेगनवर नाझींचा कब्जा होता. डेन्मार्कच्या लोकांना भांडण तंटयामध्ये अजिबात रस नाही व सदोदीत ते मैत्रिपूर्ण, समजुतदार व मदत करणारे असतात.

२) सिंगापूर

गेले कित्येक वर्षांमध्ये संप, दंगा अशा अशांत गोष्टी न पाहिलेला सिंगापूर हा छोटा पण विकसित देश. नुसता शांतताप्रिय नसून सिंगापूर एक श्रीमंत देश सुध्दा आहे.

३) स्लोवानिया

युरोपमधील छोटा परंतु सुंदर देश स्लोवानिया. हिंसा, चोऱ्या इ. करामती करणारे लोक कमी असल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात पोलीस असणारा स्लोवानिया एक सुंदर देश आहे.

४) स्विडन

गेले दोनशे वर्षे कोणत्याही युध्दात सहभागी नसणारा उत्तर युरोपमधील देश स्विडन. अत्यंत कमी प्रमाणात होणार्या चोऱ्या-माऱ्यामुळे स्विडनचे नाव शांतदेशामध्ये आहे. परंतु स्विडन स्वत: एक शस्त्रांस्त निर्यात करणारा जगातील महत्वाचा देश आहे हे खटकतेच.

५) आइसलँड

नैसर्गिक सुंदरता लाभलेला हा देश जागतिक प्रवाशांचे एक आवडते डेस्टीनेशन आहे. जागतिक राजकारणात क्वचितच भाग घेणारा आइसलँड शांत देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर तेथील मनमिळावू समाजामुळेच आहे.

760 total views, 1 views today