न्यूटन, आइनस्टाईन, स्टिव जॉब, बिल गेटस अशी अनेक नावे आपण ओळखतो. त्यांनी आपले जगणे आनंदी केले हे ही जाणतो. स्मार्ट दोस्तने अशाच पाच संशोधकांची आणि त्यांच्या उपकरणांची याद जमा केली आहे. ज्यांनी आपले जगणे सुखी केले.

१) ए.टी.एम. – जेम्स गूडफेलो

अॅटोमॅटीक टेलर मशीन (ए.टी.एम.) व पर्सनल आयडेंटीफिकेशन नंबर (पी.आय.एन.) चा वापर आता सर्वमान्य झाला आहे. पैशांच्या देवघेवीचे काम सुरक्षित व सोप्याप्रकारे करणारी ही मशिन्स नावाप्रमाणेच गूड असणाऱ्या गूडफेलोने तयार केली. परंतु वाईट म्हणजे त्याबद्दल त्याच्या पैशामध्ये (मिळकतीत) एका पेनीचीसुध्दा वाढ झाली नाही. मी फक्त माझे कर्तव्य करीत आहे असेच ते म्हणाले खरोखरच गूडफेलो.

२) चॉकलेट बार – जोसेफ फ्रे

१८४७ साली जगात प्रथमच चॉकलेटचे बार विकले गेले आणि त्याचे श्रेय जोसेफना जाते. वाफेवर चालणार्या बॉयलरचा वापर करुन कोकोची पावडर करणे व त्यानंतर चॉकलेटचे बार करण्याची कसब जोसेफनी विकसित केली. त्या आधी चॉकलेट खाणे हा एक महागडा शौक होता. परंतु जोसेफ फ्रेनी तुम्हा आम्हासाठी चॉकलेटचे दरवाजे उघडले.

३) कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग – डेनिस रिची

अब्जाधिश बिल गेटस, स्टिव्ह, जॉब यांना जरी संगणक क्रांतीचे श्रेय जात असेल तरी डेनिस रिचींनी शोधलेल्या ’’सी’’ प्रोग्रॅमिंग व ’’युनिक्स’’ ला देखील क्रांतीचे श्रेय देणे उचित.

४) टाईपरायटर – पेलेग्रीनो तूरी

आज आपण वापरतो तो QWERT कीबोर्ड हा एकेकाळी टाईपरायटरमध्ये वापरला जाणाऱ्या कीबोर्डचा वारस आहे हे अनेकांना माहित नसेल. इटालियन संशोधक तूरीने जगातील पहिला टाईपरायटर तयार कले असे म्हणतात. सुधारणा होत होत पूर्वीचे रुप बदलत गेले परंतु कीबोर्डच्या की बदलल्या नाहीत.

५) इमोटिकॉन – स्कॉट फलहॅम

व्हाटस ऍप मेसेजींगच्या जमान्यात पिवळ्या रंगाच्या वर्तुळांना आणि त्यामुळे समजणाऱ्या मुडसना फार महत्व आहे. हसणारे, रडणारे वाकूल्या दाखवणारे इमोटिकॉन्स वापरण्याची कल्पना सन १९८२ ला स्कॉटला सुचली. सुरवातीस वर्तुळे नव्हती तर फक्त चिन्हे होती. मुडस बदलत गेले इमोटिकॉन्स वाढत गेले.

2,340 total views, 9 views today