चित्रात दाखवलेल्या सोन्याच्या शर्टबद्दल आपल्याला खूप उत्सूकता होती. कारण एका मराठमोळ्या माणसाने तो शर्ट परीधान केला आहे. दत्तात्रय फूगे आणि त्यांचा ३०० तोळ्यापेक्षा जास्त सोने असणारा शर्ट त्याच्या भयंकर जास्त किंमतीमूळे बराच गाजला. महागड्या वस्तूंबद्दल लोकांच्या मनात फार कुतूहल असते म्हणूनच ‘स्मार्टदोस्ताने’ महागड्या पण रोजच्या वापरातील वस्तूंची ही यादी तयार केली आहे.

1. प्यायच्या पाण्याची बाटली : रू. ३,६०,०००/- :

‘अक्वा डी क्रिस्टीलो, ट्रिब्यूटो ए मोदीग्लीआनी’ असे सूंदर नाव असणाऱ्या या पाण्याच्या (शुध्द पाण्याच्या) बाटलीने किंमतीचे सर्व विक्रम मोडीत काढले. ७५० मि.ली. ला फक्त तीन लाख साठ हजार रूपये…. आइसलँडचा बर्फाळ प्रदेश, फ्रान्समधील नद्या व फिजीमधील अतिशूध्द पाण्याचे मिश्रण असलेले हे पाणी सोन्याचा मूलामा असलेल्या बाटली मधून विकले जाते.

पडली ना घशाला कोरडं?

2. ऍरोरा डायमॅन्टे पेन : रू. ८,८२,००,०००/- :

ऍरोरा या प्रसिध्द इटालीच्या पेन कंपनीने तयार केलेले संपूर्ण हिरेजडीत पेन. रू. आठ कोटी ब्याएैंशी लाख फक्त. शर्टाच्या खिशाला लावून फिरताना छातीत कळ येईल असे वाटते. आठ कोटीचा पेन लावायला शर्ट किती कोटीचा पाहिजे कोण जाणे.

असो… असतो एक एकांना शौक.

3. पायमोजे – रू. ६२,०००/- :

सॉक्स, पायमोजे त्याची अशी काय किंमत? असे वाटणाऱ्यांसाठी हा शॉक. व्हाक्यूना प्राण्याच्या लोकरीपासून तयार केलेली ही सॉक्सची जोडी फक्त रू.बासष्ठ हजारांना मिळते.

आहे का नाही सॉक्सचा शॉक?

4. बुध्दीबळ – रू. ५८,८०,००,०००/- :

रॉयल डायमंड बुध्दीबळ पट व सोंगट्या जगातील सर्वांत महागडा सेट समजला जातो. प्लॅटीनम, सोने यापासून बनवलेल्या हत्ती, घोड्यांवर हिरे, माणिक आणि इतर अनेक मौल्यवान खडे बसवले आहेत. सुमारे ४५०० तास काम करून तयार केलेली ही कलाकृती अठ्ठावन्न कोटी, ऐंशी लाख. रूपयांमध्ये मिळेल.

 परंतू हा बुध्दीबळ सेट वापरून खेळताना बुध्दी चालेल का याची शंका आहे.

5. सोन्याचा टॉयलेट पेपर : ७,८०,०००००/- 

एषोआरामाची सवय म्हणा किव्हा पैशाचा दुरुपयोग म्हणा पण सोन्याचा टॉयलेट पेपर म्हणजे हाईटच. “टॉयलेट पेपर मॅन” या कंपनीने तयार केलेला हा पेपर २२ कॅरट सोन्यामध्ये बनवला आहे. दुबईमध्ये तयार केलेला ह्या तीन पदरी कागदाच्या रोलची किंमत फक्त ७८०००००० रुपये आहे. ऑर्डर करण्यासाठी “टॉयलेट पेपर मॅनच्या” वेबसाईटला भेट द्या. रोलबरोबर एक श्याम्पेंनची बाटली मोफत मिळेल असे म्हणले आहे.

फक्त एक…..?  एक से मेरा क्या होगा – असे म्हणावेसे वाटते…. किंमत एैकून ……

539 total views, 1 views today