भविष्याचा विचार करण्याची क्षमता असणारी प्रजाती म्हणून मानवजातीची ओळख करून देता येईल. परिस्थीतीचा अंदाज घेवून आपल्या बूध्दीच्या बळावर मानव जातीने फारच थोड्या काळात पृथ्वीवर अनेक बदल घडवून आणले. अनेक शोध लावले तसेच राहण्यासाठी शहरेही वसवली. ही शहरे कालांतराने नाहीशीही झाली. भारतातील (सध्या पाकीस्तानमध्ये) हडाप्पा-मोहेंजदडो हे एक त्याचेच उदाहरण.
पुरातनकाळी समृध्द असलेली ही शहरे आपला ठसा उमटवून आणि गूढ मागे ठेवून लूप्तझाली. स्मार्टदोस्तने अशाच नाहीश्या झालेल्या शहरांची यादी बनवली आहे.

1. जॉर्डनमधील पेट्रा शहर

ख्रिस्तपूर्व ६० व्या शतकातील राजधानीचे शहर. हॉर नावाच्या डोंगरामध्ये कठीण दगडात कोरलेल्या घरांचे हे शहर वास्तूशास्त्राचा अनोखा नमूना म्हणून ओळखला जातो. आजूबाजूच्या वाळवंटी प्रदेशाला पाणी पूरवठा करण्यासाठी पेट्रामध्ये छोटे छोटे कालवे खोदले होते. इंडीयाना जोन्स या चित्रपटात दाखवले गेलेले हे शहर १८१२ ला स्विस प्रवासी जोहाननने शोधले.

2. इटालीमधील पोम्पी शहर

इसवीसनपूर्व सूमारे ७९ साली झालेल्या महाभयंकर ज्वालामूखीमध्ये सपूर्णपणे नाहीसे झालेले हे पोम्पी शहर. असे म्हणतात की तो ज्वालामूखी सतत दोन दिवस लाव्हा आणि राख ओकत होता. पोम्पी शहरातील नागरीक, रहवासी ठिकाणे पूर्णपणे राखेखाली व गरम लाव्हारसामध्ये बूडवूनच हा ज्वालामूखी शांत झाला. त्यानंतर जवळजवळ १७०० वर्षांनी म्हणजे १७४९ साली एका शेतकऱ्याला योगायोगानेच या शहराचा शोध लागला.

३.  इजिप्तमधील मेम्फीस शहर

कैरोच्या दक्षीणेस राजा मेनीस याने ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपूर्वी मेंम्फीस हे समृध्द शहर उभारलेे.  मेम्फीस व्यापारी, सांस्कृतीक आणि धार्मीक बाबींमध्ये अत्यंत पूढारलेले शहर होते. परंतू रोमन साम्राज्याच्या उदयामूळे मेम्फीस शहर सोडून रहीवाश्यांना पळून जायला लागले व मेम्फीस संपूर्ण ओसाड पडले. आज या एकेकाळच्या समृध्द शहराचे फक्त अवशेषच पहावयास मिळतात.

4. इराकमधील बाबीलॉन शहर

जगातील सात आश्चऱ्यांपैकी एक असणारे हँगींग गार्डन (एक प्रकारचे टेरेस गार्डन) ज्या शहरात होते ते प्रगत बाबीलॉन शहर बगदादच्या दक्षीणेस वसवले होते. मेसोपोटेमियाच्या पहील्या शहरांपैकी एक बाबीलॉन शहर औषधउपचार, कायदा व सूवस्थेचे एक उत्तमप्रतिक होते.
आज या शहराचे काही अवशेषच आपणास पहावयास मिळतात. काटकोनातील रस्ते, विस्तीर्ण क्रिडांगणे आणि सांडपाण्याची व्यवस्था असणारे बाबीलॉन आज एक भकास अवशेष बनून राहीले आहे.

5. इराण मधील पर्सेपोलीस शहर

पर्शीयन साम्राज्यातील चार राजधान्यापैकी एक असणारे पर्सेपोलीस शहर दारीयस या राजाने वसवले होते. ख्रिस्तपूर्व ५१८ साली वसवलेल्या ह्या श्रीमंत आणि कलात्मक शहराचा नाश ख्रिस्तपूर्व ३३० साली ऍलेक्झँडर दी ग्रेटने केला. तरीसूध्दा आजअखेर शाबूत असणाऱ्या दगडी खांबांवरून व त्यावरील कलाकूसरींवरून पर्सेपोलीसची समृध्दता दिसून येते.

772 total views, 1 views today