1. मॅकडोनाल्डसचे पहीले दूकान,१९४८:

रिचर्ड आणि मॉरीस मॅकडोनाल्ड या दोन भावांनी सन १९४० साली मॅकडोनाल्डस बार-बे-क्यू नावाने सुरू केलेल्या रेस्टॉरंटचे बदललेले रूप आणि पसारा आपण पाहतोच. सुरूवातीला वेगवेगळे २५ खाद्यपदार्थ विकणाऱ्या या भावांनी आपल्याला फायदा बर्गर्स विकून मिळतोय हे समजताच सन १९४८ ला कॅलिफोर्निया येथे फक्त बर्गर्स, सॉफ्ट ड्रींक्स आणि फ्रेंच फ्रॉइज विकणारे नवीन ‘मॅकडोनाल्डस’ सेल्फ सर्व्हीस आऊटलेट काढले. सुमारे पाच वर्षांनी दुसरे आऊटलेट काढले. नंतर मॅकडोनाल्डस ज्याला आपण ‘मॅक डी’ म्हणूनही ओळखतो जगभरात प्रसीध्द झाले. सन २०१३ ला निव्वळ नफा ३३०० कोटी रूपयांपेक्षा जास्त आणि १८ लाख कामगार असलेल्या मॅकडी या पहिल्या स्टोअरचा फोटो तुम्हाला गुणवत्तेच्या जोरावर काहीही अशक्य नाही हे दाखवून देतो.

2. मायक्रोसॉफ्टची पहिली टीम, १९७८

१ जानेवारी १९७५  पॉल ऍलनने आपला मित्र बिल गेट्सला संगणकांसाठी ऑपरेटींग सिस्टीम विकसीत करावयाची आयडीया सांगितली. गेटसला तत्काळ‘बेसीक’ या लॅग्वेजसाठी ओ.एस. तयार करण्यामध्ये फायदा आहे हे जाणवले आणि सुरू झाली मायक्रोसॉफ्ट कंपनीची यशोगाथा. कंपनीचे ‘‘मायक्रोसॉफ्ट’’ हे नाव देखिल पॉल ऍलनने सूचवले. कंपनीच्या पहिल्या १२ स्टाफ मेंबर्सचा हा फोटो ज्यामध्ये खालील बाजूस डाव्या बाजूला बिल गेटस व उजव्या बाजूस पॉल ऍलन दिसत आहेत. सध्या संगणक क्षेत्राचा बादशहा मायक्रोसॉफ्ट ५ लाख कोटी पेक्षाही जास्त रूपयांची सॉफ्टवेअर्स आणि इतर वस्तू विकतो. १२ माणसांनी सुरू केलेल्या कंपनीमध्ये आता १,१०,००० तज्ञ काम करतात व जगातील १०५ देशांमध्ये मायक्रोसॉफ्ट काम करते आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतीय श्री. सत्या नाडेला आता मायक्रोसॉफ्टचे C.E.O.आहेत.

3. अॅपलचे निर्माता स्टीव व स्टीव्ह, १९७६

जगातील सर्वात महागडा ब्रँन्ड  असणारी कंपनी ‘‘अॅपल’’. आयफोन, आयट्यून, आयपॅड सारख्या अनोख्या आणि प्रगत प्रॉडक्टसनी जगाला वेड लावणाऱ्या कंपनीची सुरूवात कॉम्प्यूटर तयार करणारी कंपनी म्हणून झाली. सन १९७६ स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांच्या आनंदी छटा दाखवणारा हा फोटो.भविष्यात जगाला मिळणाऱ्या आनंदाची सुरूवातच होती असे वाटते.अगदी कर्जकाढून सुरू केलेली ही छोटी कंंपनी आज जगातील दुसऱ्या नंबरची आय.टी. कंपनी आता १० लाख कोटी रूपयांचा टर्नओव्हर असणारी कंपनी बनली आहे.

4. गूगलची सुरूवात, १९९८

अगदी आलीकडल्या काळातील परंतू सर्वांच्या ओठावर ज्याचे नाव असते ती ‘‘गूगल’’ सन १९९६ साली लॅरी पेग आणि सर्जी ब्रिन या विद्यार्थ्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सीटीचा प्रोजक्ट मधून सुरू केली. म्हणूनच गूगलचे पहिले डोमेन नेम गूगल.स्टॅनफोर्ड.एज्यू (google.stanford.edu) असेच होते. आज जगातील सर्वांत आवडत्या असलेल्या सर्च इंजिनने मे २०११ ला मासिक १०० कोटी यूजर्सचा टप्पा पार केला. महिन्याला शंभर कोटीवर लोकांना माहितीची कवाडे उघडणाऱ्या गूगलच्या याच सुरवातीच्या टीमला प्रणाम.

5. आणि आता आइनस्टाईनचे ऑफीस,१९५५

जगातील सर्वांत प्रसिध्द शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या आइनस्टाईन यांचे हे ऑफीस. भौतीक शास्त्राच्या १९२१ चे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या  आइनस्टाईननी विविध शोध लावून जगावर अनंत उपकार केले. वयाच्या १६व्या वर्षांपासून आपल्या प्रगल्भ बुध्दीचा वापर करून अनेक नवनवे सिध्दांत जगापूढे मांडले. या महान शास्त्राज्ञाने ज्या कार्यालयात बसून हे अफाट काम केले त्या ऑफिसचा हा दूर्मिळ फोटो.

739 total views, 1 views today