क्रिकेट हा खेळ विलक्षण त्याहून विलक्षण क्रिकेटमधील विक्रम स्मार्टदोस्त ने जमा केलेली ही रेकॉर्ड लिस्ट शंभर शतकांचा बादशहा सचिन तर अव्वलच.

१) १० रन्स १० विकेट

यॉकशायरच्या डावखूरा स्पिनर हेडलीच्या नावावर जमा असणारा हा विक्रम. ३७८ प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या हेडलीने एकूण १९५६ गडी बाद केले. १९३२ ला नॉटींग हॅम संघाचा स्कोर नाबाद चव्वेचाळीस होता. पण हेडलीने जेव्हा चेंडू हातात घेतला तेव्हा सदुसष्ठमध्ये सर्व संघ कोलमडला. हेडलीचे समीकरण १९.४-१६-१०-१० म्हणजे १० रन्स मध्ये १० विकेटस.

२) ८५१ रन्सनी हार

प्रथम श्रेणी सामन्यातील कदाचित सर्वांत शर्मनाक हार. आयूब ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये डेरा इस्माइल संघाविरुध्द ९१० रन्स ठोकल्या गेल्या. नाऊमेद झालेल्या डेरा इस्माइल संघाने पहिल्या डावात फक्त ३२ रन्स काढल्या व दुसऱ्या डावामध्ये तर २७. पाकिस्तान रेल्वेने हा सामना ८५१ रन्सने जिंकला.

३) कसोटी मालिकेत ९७४ रन्स

ऍशेस मालिकेसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये एका मालिकेत सर डॉन ब्रॅडमननी तब्बल ९७४ धावा ठोकल्या होत्या. त्यापैकी हेडींग्लेच्या सामन्यात पहिल्याच दिवशी डॉननी एकट्याने ३०९ धावांचा पाऊस पाडला होता.

४) मुरलीधरनच्या १३४७ विकेटस

वयाच्या विसाव्या वर्षी जेंव्हा श्रीलंकेकडून मुरलीने पहिला बॉल टाकला तेंव्हा ब-याच जणांना त्याच्या विचित्र बॉलीग स्टाईलचे कुतूहल वाटले. काहींनी टीकाही केली. परंतू दोन दशकानंतर जेंव्हा तो रिटायर झाला तेंव्हा टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेटस, वन डे मध्ये ५३४ विकेटस घेणारा मुरली एकमेवाव्दितीय ठरला. २०/२० मध्ये सुध्दा १३ विकेटस त्याच्या नांवावर आहेत.

५) जिम लेकरची बॉलींग ङ्गिगर १९/९०

अनिल कुंबळेने १९९९ ला एका डावात पाकिस्तानच्या १० विकेटस चटकावल्या होत्या हे आपणांला माहित आहेच. त्या आधी तो विक्रम इंग्लडच्या जिम लेकरच्या नांवावर होता. सन १९५६ ला ऑस्ट्रेलिया विरुध्द जिमने तो विक्रम केला होता. पण महत्वाचे म्हणजे त्या कसोटीत जिमने ऑस्ट्रेलियाच्या २० पैकी १९ विकेटस एकटयानेच घेतल्या. इतर बॉलर्सनी तब्बल १२३ ओव्हर्स टाकल्या, परंतु फक्त एकच गडी ते बाद करु शकले. जिमची फिगर नव्वद धावा व एकोणीस विकेटस.

411 total views, 1 views today