इंटरनेटवर चॅटींग करताना संभाषण फास्ट आणि इझी होण्यासाठी वेगवेगळ्या साइन्स वापरल्या जातात. कधी-कधी याला स्लँग किंवा इंटरनेट शॉर्टहन्ड असेही म्हणतात. भावना दर्शवणार्‍या इमोटीकॉन्स पासून स्टाइल दाखवणार्‍या या सिम्बॉल्सचा वापर सर्रास केला जातो. स्मार्टदोस्तने जागात जास्त वापर होणार्‍या ५ चॅटींग साइन्सची यादी केली आहे.

 

१) ASL – AGE SEX LOCATION ?

 अनोळख्या व्यक्तींबरोबर चॅट करताना त्यांची ओळख होण्यासाठी जास्त वेळा ASL? असा प्रश्‍न विचारला जातो. पलीकडील व्यक्तीचे वय, तो पुरूष आहे का स्त्री व कोठून चॅट करतो, त्याचे ठिकाण कळवण्यासाठी असे विचारले जाते. परंतू फसवाफसवीच्या जगात बर्‍याचवेळा खोटी माहिती देवून फसवण्याचे प्रकार अनेकवेळा होतात.

2) ASAP – AS SOON AS POSSIBLE!

एखादे काम अर्जंट असेल आणि तुम्ही दुसर्‍या यूजर्सना ASAP म्हणून लवकरात लवकर काम करा किंवा करूया असे कळवू शकता.

3) ILY – I LOVE YOU !

तुमचे एखाद्यावर प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी ILYचा वापर केला जातो. फक्त ILY टाइप करून वा त्याबरोबर स्माईलींचा वापर करून प्रेम व्यक्त केले जाते.

४) MYOB – MIND YOUR OWN BUSINESS !

प्रेमव्यक्त करूनच भागत नाही तर कधी-कधी माझ्या कामात तू दखल देवू नकोस असा दमही चॅटींगमध्ये द्यावा लागतो. त्याचसाठी MYOB चा वापर करतात.माइंड यूवर ओन बिझनेस!

५) OMG – OH MY GOD !

अरे बापरे! अरे देवा!! असे आश्‍चर्यचकीत झालो असल्याचा भाव OMG व्दारा देतात. OMG च्या पुढे उद्गार चिन्ह वापरून वा एखादे वाक्य लिहून भावना कळवल्या जातात.
तर ही होती टॉप ५ स्लँगची यादी. याशिवाय,
* खूप जोरात हसू आले म्हणून ङर्रीसह Lough Out Loud  असे लिहतात. (LOL)
* कोणीतरी बघते आहे वा ऐकते आहे हे सांगण्यासाठी गूपचूप SOS म्हणजे Somebody Over Shoulder असे लिहतात.
* चॅटींग करता करता काही काम आले तर तुम्ही BRB लिहून Be Right Back म्हणजे लगेचच परत येतो असे म्हणू शकता.
असो! यादी जरा लांबतीय. तर स्मार्टदोस्त येथेच थांबतोय, जाता जाता कूणाला Hugs and Kisses द्यावे वाटले तर टाइप करा XOXO.

620 total views, 1 views today