अॅटमबॉंम्बचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांना अणूच्या अचाट ताकदीचा अंदाज होता. अणूंचा वापर चांगल्या तसेच वाईट वापरासाठी होवू शकतो याचा अंदाज त्यांना असल्यामूळेच अण्वीक शक्तीचा काळजीपूर्वक वापर करण्याचे अवाहन त्यांनी केले. परंतू काळजी घेवूनसुध्दा जगभर अण्वीक अपघात होतच राहिले. ‘स्मार्टदोस्त’ ने तयार केलेली अण्वीक अपघातांची यादी –

१) कॅसल ब्राव्हो – मार्च १९५४ :

पॅसीफीक महासागरातील मायक्रोनेशीयन बेटाचा वापर अमेरीकेने अण्वीक शस्त्रांची चाचणी करण्यासाठी सन १९४६ ते १९५८ पर्यंत केला. सन १९५४ ला पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी करण्यासाठी सुध्दा याच ठिकाणाची निवड करण्यात आली. मिशनचे सिक्रेट नाव ‘कॅसल ब्राव्हो’ असे ठेवण्यात आले. १ मार्च १९५४ ला बॉम्बचा जेव्हा स्फोट केला तेव्हा अंदाजापेक्षा अतिप्रमाणात ऊ र्जा व अपायकारक किरणोत्सर्ग झाला. ४ मेगाटन चा स्फोट होइल असे वाटत असताना १५ मेगाटनाचा स्फोट झाला. २००० मिटर रूंद व ७५ मिटर खोल खड्डा पडला. हिरोशीमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १२०० पट उर्जा तयार होवून विषारी वायूंचे ढग पॅसीफीक महासागरावर हजारो मैल पसरले. जवळची छोटी छोटी बेटे किरणोत्सर्गाच्या लपेट्यात आली, त्यावरील रहिवाश्यांना अजूनही शारिरीक व्यंग असलेली मूले जन्मतात.

२) मयाक अणूभट्टी दूर्घटना – १९५७ :

रशियन फेडरेशनमधील मयाक अणूभट्टी जगातील एक मोठी भट्टी आहे. रशियाच्या छूप्या शस्त्र योजनेचा एक भाग असलेल्या या अणूभट्टीमध्ये सप्टेंबर १९५७ ला एक मोठा भयंकर स्फोट झाला. रशियाचे छूपे प्लॅन्स यामूळे जगाच्या लक्षात आलेच परंतू दूर्घटनेमध्ये झालेली हानीने जगाला नंतर अनेक वर्षेहलवून सोडले. स्फोट इतका जबरदस्त होता की, त्यामध्ये ७५ टन ढछढ ची शक्ती होती. सुमारे १५,००० चौरस मैल परीसरातील ४,७०,००० लोकांना अण्वीक किरणांचा संसर्ग झाला. हजारो लोकांच्या शरीरावरील त्वचा अक्षरश: ओघळून गेली आणि शतकानूशतके सर्व परीसर काहीच जीव जिंवत रहावयास अनूपयोगी झाला.

३) चर्नोबील दूर्घटना – एप्रील १९८७ :

सध्याच्या यूक्रेन देशामधील अणूभट्टी नं. ४. २६ एप्रिलला अचानक एका भट्टीमध्ये दाब वाढला. सर्व प्रकारचे दूरूस्तीचे प्रयत्न नाकाम ठरले आणि ती भट्टी अक्षरश: फूटली. फक्त यूक्रेनच नव्हे तर जवळपासचे देश, बेलारूस व रशिया या अपघाताची शिकार बनले. ग्रिनपीस संस्थेच्या अहवालानूसार सुमारे २,००,००० लोक मृत्यू पावले. हिरोशीया, नागासाकी मधील किरणोत्सर्गापेक्षा २०० पट जास्त किरणोत्सर्ग झाल्यामूळे जगातील सर्वात भयंकर अपघात म्हणून चर्नोबीलचा उल्लेख केला जातो.

४) फूकूशिमा – मार्च २०११ :

जपान देशाला सतत नैसर्गिक भूकंपाना सामोरे जावे लागते. परंतू याच नैसर्गिक भूकंपामूळे जपानला अण्वीक अपघाताला सामोरे जायला भाग पाडले. ११ मार्चच्या शुक्रवारी जपानच्या उत्तरेला सूमारे ८.९ क्षमतेचा भूकंप झाला. समुद्रामध्ये दहा मिटर उंच लाटा तयार झाल्या आणि जपानच्या किनार्‍यावर त्यांनी धावा बोलला. सूनामीच्या तडाख्यात फक्त लोक आणि रहवाशी वस्तीच आली नाही तर किनार्‍यावरील अणूभट्टयादेखिल सापडल्या. यातूनच सुरू झाली अपघातांची मालिका. प्रथम अणूभट्टी नं. १ व कालांतराने इतर अणूभट्टयांमधून किरणोत्सर्ग सुरू झाला. त्यामूळे, मूख्यत: पाणी आणि वनस्पती वापरण्यास अयोग्य झाल्या. आज त्याभागातील जमीन संपूर्णपणे आरोग्यास हानीकारक ठरत आहे.

५) हिरोशीमा, नागासाकी – १९४५ :

दुसर्‍या जागतीक महायुध्दात जपानच्या या दोन शहरांवर अमेरिकेने टाकलेल्या अणूबॉंम्बची अपघात अशी नोंद करता येणार नाही. परंतू, मानवी इतिहासातील अणूउर्जेने केलेला पहिला संहार म्हणून या यादीत हिरोशीमा-नागासाकीचा उल्लेख आहे. मानवजातीला एक कलंक म्हणून ओळखलेल्या गेलेल्या या संहारामध्ये ६ ऑगस्ट आणी ९ ऑगस्ट रोजी अमेरीकेने बॉम्ब टाकले. पहिल्या चार महिन्यात हिरोशीमा मधील १,६६,००० व नागासाकीतील ८०,००० लोक मृत्यू पावले. त्यातील निम्मे लोक पहिल्याच दिवशी मृत्यू पावले. जिवसृष्टीचा भयंकर नाश करणार्‍या या घाणेरड्या कृत्यामूळे नंतर हाजारो रहिवाश्यांना शारीरिक  व्यंग घेवून जगावे लागले. त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये या किरणोत्सर्गाच्या संसर्गामूळे शारीरिक कमतरता निर्माण झाली, ती वेगळीच.

498 total views, 2 views today