एक मिनीट म्हणजे आपल्या आयुष्यातील एक छोटासा काळ. परंतु याच ६० सेकंदात भरपूर घडामोडी होवू शकतात हे आपण जाणतोच. स्मार्ट दोस्तने ६० सेकंदात विश्वात काय होते याची यादी तयार केली आहे. वाचा तर ६० सेकंदाची धमाल.

1. फेसबुकवर २.१ कोटी लाईक्स

 फेसबुकचा बॉस मार्क झुकेरबर्ग आता देवासारखा पॉवरफूल होत आहे. १२० कोटीपेक्षा जास्त युजर्स असणा-या फेसबुकवर युजर्स कांहीही अपलोड करतात. दिवसाला दहा तास फेसबुकवर स्वतःचे २०० पेक्षा जास्त फोटो अपलोड करणारा एक तरुण ब्रिटनमध्ये वेडयाच्या दवाखान्यात दाखल झाला. होता असे म्हणतात. तर सांगायचे काय तर  ६० सेकंदात फेसबुकवर दोन कोटी पेक्षा जास्त लाईक्स होतात. (मित्रानो मी हे आर्टिकल २०१४ ला लिहिलेय.  आता फेसबुक व लाईक करणारे फार पुढे गेलेत. )

2.पृथ्वीवर प्रत्येक सेकंदाला अंदाजे 100 वेळा विज कोसळते:

दिवसाला जवळपास ८६ लाख वेळा आणि अंदाजे 3,000,000,000 प्रत्येक वर्षी पृथ्वीवर विज कोसळते. विज  ही सूर्यापेक्षा पाच पटीने गरम असते. विजेचा एक लोळ सुमारे 50000 डिग्री फॅरेनहाइट इतकी उर्जा तयार करतो.
संदर्भ: डब्लू.डब्लू.डब्लू.व्हेदर.कॉम

३. हृदय ३७७ लिटर रक्त पंप करते

आता तुम्ही हे वाचत असतानाच फक्त एका मिनीटात ३७७ लिटर रक्त तुमच्या -हृदयाव्दारे शरीरभर पंप करुन पसरवले जाते. पहा नां १८ लिटर पाणी मावणा-या दोन बादल्या उचलून इकडून तिकडे न्यायच्या तर आपणांस किती त्रास होतो. येथे तर एका मिनीटात ३७७ लिटर.

४. विश्व २७६६. ४ मैल पसरते

आपले ब्रम्हांड पसरत आहे.सौरमाला एक मेकांपासून दूर जात आहेत. माहित आहे किती वेगाने ? फक्त १७६६.४ मैल प्रती मिनीट.

५. नायके २१,९०,००० रुपये मिळवते

नायके च्या वस्तु स्पोर्ट शूज, टी शर्टस, (फिटनेस गिरर्स)अनेकांना जगभर आवडतात. कंपनी त्यामुळे पैसे मिळवते. एका मिनीटात नायकेच्या तिजोरीत  फक्त २१,९९,००० ची वाढ होते. फक्त . . . . . ?

ता. क. : हे सर्व वाचल्यावर परत परत वाटले की आर्टिकल २०१४चे असल्यामुळे नायके, फेसबुक अश्या मानवी कंपन्यांची आकडेवारी बदलली आहे. परंतु नैसर्गिक गोष्टी जश्याच्या तश्या आहेत.

968 total views, 2 views today