जमावबंदी, नाकाबंदी, दारुबंदी, अशा अनेक बंदी आपणास माहीत आहेत. परंतु जगात काही देश असे आहेत जिथे विचित्र प्रकारचे ’बॅन’ आहेत. जसे की ग्रीस व चीनमध्ये व्हिडीओ कन्सोलवर बंदी आहे. ’स्मार्टदोस्त’ कडे असलेली ही अनोखी बंदी लिस्ट.

 

१) बेबी वॉकर : कॅनडा.

२००४ साली कॅनडा या देशात आधुनिक बेबी वॉकर वापरायला बंदी घातली गेली. बेबी वॉकरमुळे बालकाची वाढ निट होत नाही हे एका स्टडीमध्ये लक्षात आल्यावर ही बंदी घातली गेली.

२) च्युहूंग गम : सिंगापूर

१९९२ पासूनच च्युइंग गमच्या आयात व वापरावर सिंगापूरमध्ये बंदी लागू झाली. देशातील रस्ते, इमारती व इतर ठिकाणे च्युंइंग गम चिकटवून खराब करणार्‍यांना चाप बसवण्यासाठीच ही बंदी घातली गेली. आहे ना मेरा भारत महान?

३) पिवळे कपडे : मलेशिया

पिवळे कपडे, टोप्या, शू लेस, इ. वापरावर सन २०११ मध्ये मलेशिया देशात बंदी घालण्यात आली होती. विरुध्द पाटीचा पिवळा हा ऑफिशीयल रंग असल्यामुळेच सत्ताधारी पार्टीने हे केले.

४) एनर्जी पावडर : डेन्मार्क

डेन्मार्क देशामधील काही वर्गाला व्हिटॅमीनयुक्त दुधामध्ये घालायची पावडरमुळे मुलांवर वाईट परिणाम होतील असे वाटले. दुर्दैवाने याच समजुतीमुळे यासारख्या एनर्जी पावडरवर या देशात बंदी आहे.

५) मुलांची नावे : डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये सरकारने मान्य केलेली फक्त २४,००० नावे आहेत.पालकांनी आपल्या मूलांना यापैकीच एखादे नाव ठेवावे असा हुकूम आहे म्हणतात . म्हणजे या २४००० नावांपेक्षा इतर कोणत्याही नावाने आपण मुलांना हाक मारु शकत नाही. आहे की नाही अनोखी बंदी.

671 total views, 1 views today