फुटबॉलचा वल्डकप जवळ येतोय. जगात सर्वांत जास्त पॉप्युलर असणारा हा खेळ अत्यंत रोमांचकारक आणि अटीतटीने खेळला जातो. त्यामुळे टॅलेंटेड प्लेअर्सना खूप मानसन्मान असतो. आपल्या टिममध्ये असे खेळाडू असावेत म्हणून प्रत्येक क्लब खेळाडूंना खूप पैसे देतात. स्मार्टदोस्तने अशाच पाच महागडया आणि श्रीमंत ङ्गुटबॉलपटूंची यादी बनवली आहे.

१. ख्रिस्टीयानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)

अत्यंत पॉप्युलर असा रोनाल्डो महागडा देखील आहे. वर्षाला २६५ कोटीपेक्षा जास्त कमाई असणारा रोनाल्डोचा पगार १३८ कोटी आहे व जाहिरातीतून त्याला १२७ कोटी रुपये मिळतात.

२. लियोनेलमेसी (Lionel Messi)

महागडया खेळाडूंच्या यादीतील दुसरा खेळाडू मेसी. अनेक जागतिक रेकॉर्डस नांवावर असणारा मेसी २४६ कोटी वार्षिक कमाई करुन नं. २ वर पगार १२० कोटी व इतर कमाई जाहिरातीतून.

३. वेन रुनी (Wayne Rooney)

इंग्लडचा स्टार खेळाडू. बेस्ट स्ट्रायकर, मॅचेस्टर युनायटेड कडून फॉरवर्डला खेळ, कमाई १२७ कोटी पैकी पगारच १०९ कोटी.

४. सर्जीओ अग्युरो (Sergio Aguero)

जागतिक किर्तीच्या दिआगो मॅराडोनाचा हा जावई. मॅचेस्टर युनायटेड कडून स्ट्रायकर म्हणून खेळ. कमाई १२६ कोटी पैकी पगार १०५ कोटी.

५. दिदीअर ड्रोग्बा (Didier Drogba)

आयव्हरी कडून खेळणारा हा सुपर लिगचा खेळाडू. चेल्सीकडून क्लब फुटबॉल खेळणारा दिदीअर पाचव्या नंबरवर. कमाई १२५ कोटी पैकी पगार ९५ कोटी.

*     वरील कमाई ही वार्षिक, पगार वार्षिक, रक्कम भारतीय रुपयामध्ये.

557 total views, 1 views today