वेगवान कार्स बद्दल सर्वांनाच उत्सूकता असते. फास्ट ऍन्ड फ्यूरीयस, फास्ट फाइव्ह या हॉलीवूड सिनेमापासून अनेक बॉलीवूडपटात फास्ट गाडयांचा पाठलाग हा प्रेक्षकांचा आवडीचा भाग असतो. परंतू खरोखरच्या जगात फास्ट कार्स किती फास्ट असतात याचा शोध ‘स्मार्टदोस्तने’ घेतला आणि २०१४ मधील ५ वेगवान कार्सची यादी तयार झाली.

१) बूगाटी सूपर वेरॉन (Bugatti Super Veyron) :

बूगाटीच्या पठडीत तयार झालेल्या अनेक कार्स विलक्षण ताकदीच्या असतात. बूगाटी सूपर स्पोर्टस या मागील वर्षाच्या प्रसिध्द मॉडेलपेक्षा सुमारे ३०० किलोने हलकी असलेली बूगाटी सूपर वेरॉन ही कार २०१४ ची एक फास्ट कार आहे. १६०० अश्‍वशक्तीच्या या मशीनचा स्पीड ताशी ४६३ कि.मी. आहे. १५ कोटीच्या आसपास किंमत असलेली बूगाटी वेरॉन यादीत पहिल्या नंबरला.

२) लॅम्बोर्गीनी व्हेनेनो (Lamborghini Venen) :

लॅम्बोर्गीनीने पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून व्हेनेनो जगापूढे सादर केली. अतीउच्च कार्बन फायबरचा वापर केलेली ही स्टायलीश कार स्मार्टदोस्तच्या यादीत दूसरी आहे. ६.५ लिटरचे व्ही-१२ (V-१२) इंजिन, ७५० अश्‍वशक्ती आणि ७ स्पीड ऍटोमॅटीक गिअर्स असलेली ही लॅम्बोर्गीनी ताशी ३५५ कि.मी. चा वेग गाठतो. किंमत सूमारे आडीच कोटी रूपये.

३) बूगाटी वेरॉन सूपर स्पोर्टस :

पृथ्वीतलावरची तीन नंबरची फास्ट कार १२०० अश्‍वशक्तीचे इंजिन असलेली बूगाटी वेरॉन सूपर स्पोर्टस केवळ २-४ सेंकदात ९७ कि.मी. प्रति तास वेगाचा पीकअप घेते. किंमत एक कोटी चाळीस लाख रूपये.

४) ऍस्टन मॉर्टीन वन – ७७ (Aston Mortin One – 77) :

जेम्स बॉंडपटात वारंवार दिसणारी एक सुंदर पण सुपर फास्ट कार ७.३ लिटरच्या व्ही-१२ (V-१२) इंजिनमुळे ७५० अश्‍वशक्तीची पॉवर मिळवणारी ही ऍस्टन यादी क्रमांक चार वर.

५) फेरारी ला फेरारी :

एखाद्या जेट विमानासारखी दिसणारी एक स्मार्ट कार, दोन इलेक्ट्रीक इंजिन्स व एक ६.२ लिटरचे व्ही-१२ पेट्रोल इंजिनचा वापर असणारी हायब्रीड कार केवळ २.९ सेंकदात १०० कि.मी. प्रति तास पिकअप घेणारी ही कार तुम्हाला सव्वा कोटी रूपयांत मिळेल.

570 total views, 1 views today