बॉलीवूडमध्ये गाण्यांना फार महत्व. झाडांच्या मागे पळताना असो वा गुंडाच्या समोर नाचताना असो, बॉलीवूड मधील बसंतींना गाण्याचा फार आधार. चित्रपटाची एक गरज असणाऱ्या याच गाण्यांनी मात्र रसिकांना वेळोवेळी आनंद दिला आहे. अनेक सुमधूर गाणी कोटी कोटी लोकांच्या हृदयात घर करून आहेत. स्मार्टदोस्तनी बॉलीवूडच्या या देणगीला सलाम करत याच बॉलीवूडच्या टॉप गायकांचा मागोवा घेतला. त्याची ही यादी,

1) श्रेया घोषाल :

सारेगामा म्यूझिक स्पर्धेतून पुढे आलेली ही प्रतिभावंत गायिका, फिल्मफेअर आणि चार नॅशनल अॅवॉर्डस मिळविणाऱ्या श्रेयाने इशकजादे, रावडी राठोड, बर्फी इ. अनेक चित्रपटात आपल्या सुमधूर आवाजाने रंग भरला.

2) अतिफ अस्लम:

मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या अतिफने बॉलीवूडसाठी अनेक कर्णमधूर गाण्याचा नजराणा दिला आहे. ‘रंग शरबतो का’, ‘बे इंतेहा’, ‘जिने लगाहू’ इ. गाण्याव्दारे प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

3) आयूशमान खूराना :

टिव्ही स्टार, सिने कलाकार, आणि त्याशिवाय आवाजाचा बादशहा असा हा हरहून्नरी कलाकार ‘पानी दा रंग वे’ या हिट गाण्यासारख्या गाण्यांमुळे टॉप 5 गायकांचा यादीत आहे

4) सुनिधी चौहान :

हजारो गाणी, अनेक भाषांमधील वावर असणाऱ्या सुनिधी चौहानने चेन्नाई एक्सप्रेससाठी ‘काश्मीर मैं, तू कन्याकूमारी’ हे चार्टबस्टर गाणे दिले आहे. तरंग हाऊसफूल अॅवॉर्ड मिळविणाऱ्या सुनिधीने 2013 मध्ये अनेक अविट गाण्यांचा खजिना रसिकांना दिला आहे.

5) अरजीतसिंग :

बॉलीवूडचा सध्याचा टॉप गायक. आशिकी चित्रपटाची हृदय पिळवटून टाकणारी गाणी, बेशरम मधील अतिसुंदर गाणी गाणारा अरजित 2014 चा टॉप गायक आहे.

524 total views, 1 views today