आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला त्या स्टिव्ह जॉब्सना व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे अवलिया म्हणून ओळखले गेले. iPhone, iPad, iPod हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्यांच्यामुळेच बाजारात आली. स्टीव्ह जॉब्सना सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःला वाहून घेतले होते. अफाट कल्पनाशक्ती व अपार कष्ट या जोरावर ज्यांनी जगात स्वतःचा कायमचा ठसा उमटवला त्या स्टिव्ह जॉब्स यांचे काही यशस्वी होण्याचे सिक्रेट नियम जरूर तुमच्याही आयुष्यात नक्कीच बदल घडवतील. वाचा, जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडले ते 6 नियम. जे तुम्हालाही success मिळवून देतील.

1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते

“Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do.”

दोस्तहो, तुम्ही आज कुठले ही क्षेत्र घ्या, वरवर पाहता ते खूप सोप्पे वाटते. पण जसे जसे तुम्ही त्यात डीप मध्ये जाता तेंव्हा तुम्हाला कळते की त्या कामात खूप अडचणी आहेत. त्यात देखील खूप कौशल्य लागतात. अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कामाचा प्रती उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ना तोंड देऊच शकणार नाही.

म्हणूनच अडचणी च्या वेळी तुमचं त्या कामाच्या प्रति किती आवड आहे हेच ठरवते की तुम्ही त्या क्षेत्रात रहाणार कि नाही. थोडक्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल. तर तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.

2) वेगळे विचार करा

Better Be a pirate than to join navy. Be different

बराच वेळा आपण ते करतो जे सर्व लोक करत आहेत. आपण मळलेल्या वाटांवरच चालणे जास्ती पसंत करतो. कारण नव्या वेगळ्या वाट शोधणे आणि त्या वर चालणे आपल्याला असुरक्षित वाटते किंवा आपण भितो नवीण वाटेवर चालायला.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर ते मिळवायचे असेल जे कोणी आज पर्यंत मिळवले नसेल तर तुम्हालाही ते करावं लागेल जे आज पर्यंत कोणी कधी केली नसेल. ईतर लोकांनी जे केलं, जी वाट शोधली त्याच वाटेवर तुम्ही गेलात तर तुम्ही देखील तिकडेच जाल जिकडे ते गेले. त्यात नाविन्य ते काय.

स्टिव्ह जॉब्स कॉम्प्युटर बनवायचे, मोबाईल इत्यादी अनेक गोष्टी ते हयातीत असताना अॅपल ने बनवले. या सर्व गोष्टी काय नवीन होत्या? अजिबात नाही, पण आपण बघतो अॅपल आणि बाकी कंपनी मधील फरक. येथे वेगळा विचार म्हणजे नाविनच काही तरी केले पाहिजे असा होत नाही तर सगळे जे करतात त्याचा पेक्षा आपण वेगळे करायला पाहिजे. लक्षात ठेवा “विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.”

3) पहिले पाऊल टाका

Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition.

पहिले पाऊल टाकणे हेच कधी कधी सर्वात अवघड काम बनते, तेव्हा ते पाऊल टाका आणि अंतर्मनचे ऐका, ध्येर्य बाळगा. जेंव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेंव्हा तुम्हांला दुसरे पाऊल कुठे टाकायचे हे तुम्हांला लक्षात येईल.

कोठे तरी वाचले होते कि एक व्यक्तीने त्याच्या देशाचे संपूर्ण भ्रमण केले होते ते देखील सायकल चालवत. या त्याचा पराक्रमा नंतर पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखती मध्ये त्यांनी त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला या प्रवासात सर्वात जास्ती कोणती गोष्ट अवघड वाटली. त्या वर त्या व्यक्तीचे उत्तर होते की घरचा उंबरटा ओलांडणे सर्वात आवघड वाटले. एखाद्या कामाची सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते.

4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा

स्टिव्ह जॉब्स आणि त्याचा मित्र स्टिव्ह वॉझनिएक या दोघांनी अॅपल कंपनी ची स्थापना एका गॅरेजमध्ये केली होती. त्यां दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर ‘अॅपल -1’ बनवण्या साठी 1000 डॉलर्स ची गरज होती ती त्या दोघांनी त्यांचा आवडत्या गोष्टी विकून मिळवल्या होत्या. आज तुम्हाला सांगायची गरज नाही की अप्पल कंपनी कुठे बाकी कंपनी च्या तुलनेत.

Don’t worry about too many things at once, just concentrate on one thing, start small , think big

म्हणून स्टिव्ह म्हणाले “एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.”

5) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका

Don’t let the noise of other’s opinion drown out your own inner voice

जगात सर्वात मोठी गोष्ट जी माणसाला यशा पासून दूर ठेवते ती म्हणजे लोक काय म्हणतील. आपण बऱ्याच वेळा एखादे काम, लोक काय म्हणतील हाच विचार करून करत नाही. लोक आपल्या प्रति काय विचार करतात हे तुम्हाला विचार करायची काहीच गरज नसते. लोकांचा या भाऊ गर्दीत तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज हरवू नका देऊ.

नेहमी मनातले करा, ज्यात तुमची आवड असेल ते करा. अगदी मन मोकळे बिंदास कोणाची तमा न बाळगता. आणि लोकांन साठी हे हिंदी गाणे म्हणा ‘कुछ तो लोग कहेंगे! लोगोका काम हे केहना’.

6) दुसऱ्याचं आयुष्य नका जगू

Don’t live someone else’s life

प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकांचा चेहरा वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आवाज वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा आणि युनिक आहे. मग प्रत्येकला आपले स्वतंत्र विचार असू नये. म्हणून स्वतः विचार करा. थोडा वेळ स्वतः सोबत ही व्यतित करा. जाणून घ्या तुमच्या मधील स्टिव्ह जॉब्स ला.

Your time is limited so don’t west it leaving someone else’s life.

स्टिव्ह म्हणतात. “तुमचा वेळ हा खूप मर्यादित आहे, त्याला दुसऱ्याचा आयुष्या साठी नका खर्च करू. स्वतः साठी खर्च करा. तुमच्या जहाँजाचे तुम्हीच कॅप्टन बना. तुमच्या आयुष्याचं डिजाईन स्वतः तयार करा. तुम्हाला असे करण्या साठी दुसरी संधी अजिबात नाही मिळणार म्हणून एक तरी आता करा किंवा नंतर पश्चाताप करा. निवड तुमची आहे.”

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

173 total views, 4 views today