अल्बाय्नो म्हणजे वर्णरहित मनुष्य. चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व अंग, अगदी केसांसाहित पांढरे असलेल्या लोकांना या नावाने पुकारले जाते. शरीरात मेलॅमाईन नावाचा रंगद्रव्य नसल्यामुळे अश्या लोकांचे अंग पांढरेफाटक असते. या अश्या विचित्र डीफेक्टमुळे समाजाचा यांच्याकडे बघायचा नजर्रीया वेगळाच असतो व शक्यतो अल्बाय्नोपासून दूरच रहायचा प्रयत्न सर्वजण करत असतात. परंतु ब्राझीलमधील सावो पावलो ठिकाणच्या लारा अन मारा बवार या जुळ्या बहिणींनी मॉडेलिंग जगतात आपल्या वर्णरहित कांतीच्या जोरावर धूम उडवली आहे.

याची सुरुवात झाली ती विनिसियस तेरानोव्हा नावच्या महिला फोटोग्राफरमुळे. विनिसियसने लारा अन माराची माहिती वर्तमानपत्रात वाचली अन त्यांचे गोंडस पण प्रश्नाळू चेहरे बघून तिला या जुळ्यांबद्दल काहीतरी करावे असे वाटले. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या विनिसियसने मग बवार परिवाराची भेट घेतली अन सुरु झाला एक अनोखा प्रवास. आज लारा अन मारा सदोदित फोतोशुतमध्ये व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या व्यंगाचे अजिबात दुखः होत नाही. वर्णरहित मुलींचे हे यश म्हणजे वर्णद्वेष्ट्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच होय.

म्हणतात ना सुंदरता बघाणाऱ्याच्या डोळ्यात असते.

538 total views, 1 views today