जगात वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या संस्कृतीत आगदी पूरातन काळापासून विवीध खेळ खेळणे जात आहेत. मनोरंजन तर कधी शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी खेळांचा उपयोग केला जातो. कधी-कधी हे खेळ अत्यंत धोकादायक पण असतात ‘स्मार्टदोस्तने’ जगातील ५ धोकादायक खेळांची यादी बनवली आहे.

१) हेली स्कियींग :

बर्फाळ प्रदेशामध्ये खेळला जाणारा हा खेळ पायांना विशीष्ठ प्रकारच्या फळ्या (foot sledge) लावून व हातांमध्ये वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरायच्या दांड्या (control sticks) घेवून इकडून तिकडे बर्फावर घसरत जाण्याला स्कियींग म्हणतात. नंतर-नंतर बर्फाच्या डोंगरांवर लिफ्टने जावून एका विशीष्ट ठिकाणाहून अतिवेगात घसरत येण्याची मजा खेळाडू लुटू लागले. हा अत्यंत धोकादायक प्रकार. प्रसिध्द फॉर्मूला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकरचा अपघात अशाच खेळात झाला. परंतू त्यापेक्षाही भयंकर हा हेली स्कियींग प्रकार होय. यामध्ये ठरावीकच ठिकाणी हेलीकॉप्टरने बर्फाळ डोंगराच्या माथ्यावर जातात आणि तेथून उडी मारून ओबड धोबड डोंगरावरून अतिवेगात घसरत येतात. विशीष्ठ मार्ग नसल्याने दगडांचा, दरीचा अंदाज न आल्यास प्राण गमावण्याचा धोका असलेला हा खेळ.

२) स्ट्रिट लगींग :

पायांमध्ये स्केटस बांधून वेगात जाण्याचा प्रकार माहीत आहे. परंतू दक्षिण कॅलीफोर्नीयामध्ये स्केटस पायात न बांधता एका मोठ्या स्केटवर झोपून टेकड्यांच्या उतारावरून घाटांतून वेगात खाली यायचा विचीत्र आणि धोकादायक खेळ खेळला जातो. उतारांवरील वळणांमध्ये स्केटस वर नियंत्रण न राखल्यास सरळ कडेलोट होण्याचा संभव.

३) बूल रायडिंग :

एका मस्तवाल व आडदांड बैलाच्या पाठीवर उडी मारून बसणे आणि जास्तीत जास्त वेळ स्वार होवून राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हा बूल रायडींग खेळ. हा खेळ धोकादायक का आहे त्याचे कारण म्हणजे बैलाचे सतत लाथा मारणे व स्वाराला पाठीवरून उडवून लावण्यासाठी उछल कूद करणे. जिंकण्यासाठी किमान ८ सेंकदतरी स्वार होणे आवश्यक, परंतू अगडबंब बैलासमोर हे फार धोकादायक आहे हे चित्र बघीतल्यावर कळूनच येत असेल.

४) हाय लेव्ह सर्फीेग :

अतिधोकादायक खेळांमध्ये वरच्या क्रमांकावर असणारा हा खेळ. समुद्रामध्ये २० फूटांपेक्षा जास्त उंच लाटांच्या मधून फक्त एका फळीचा वापर करून व ते सुध्दा त्यावर उभे राहून पुढे जाणे फार अवघड आहे. मोठ्या लाटा येत असतांना त्यामध्ये जी पोकळी (फोटोत दाखवल्याप्रमाणे) तयार होते त्यातून एखाद्या गूहेत गेल्या सारखे सर्फींग करणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. अजस्त्र लाटा क्षणांत सर्फरला गिळकृत करू शकतात.

५) बूल रनिंग :

बैलांवर स्वार होणे वेगळे आणि बैलांना तुमच्यावर स्वार होवू देणे हे वेगळे. स्पेनमध्ये हा महाभयंकर खेळ अजूनही खेळला जातो. एका चिंचोळया रस्त्यावर एका बाजूकडून मस्तवाल आणि ताकदवर बैल एकदम सोडले जातात. खेळांडूनी काय करायचे तर त्या बैलांच्या पूढे धावत जायचे. खेळाडू पूढे व त्यांचा पाठलाग करत येणारे हे राक्षसी बैल मागे. जगातील अत्यंत धोकादायक असा हा जानलेवा खेळ.

1,301 total views, 1 views today